आरोग्य, शिक्षण आणि रोजगार आदींचे प्रश्न आता मांडून थांबायचे नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला शेवटची मुदत देत आहोत.
पुणे - आरोग्य, शिक्षण आणि रोजगार आदींचे प्रश्न आता मांडून थांबायचे नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला शेवटची मुदत देत आहोत. जर सरकारने याबाबत पावले उचलली नाहीत तर जनतेला रस्त्यावरची लढाई सुरू करावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने क्रांती सप्ताह जन की बात : हर घर तिरंगा, हर घर संविधान' अभियान राबवला जात आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर सेंट्रल बिल्डिंग येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.यावेळी डॉ. आढाव बोलत होते.
निदर्शनाला राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्ला, समाजवादी शिक्षण हक्क सभेचे शरद जावडेकर, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयक सुहास कोल्हेकर, आरोग्य सेनेचे पदाधिकारी हनुमंत बहिरट आदी उपस्थित होते. ‘‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही नागरिकांना मुलभुत हक्क मिळू शकत नाहीयत. स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षा परिवर्तनाचा लढा अधिक अवघड आहे. आता जर परिवर्तनासाठी कृती केली नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही’’, असे मत डॉ. आढाव यांनी व्यक्त केले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक करून क्रांती सप्ताहामागची भूमिका स्पष्ट केली. ओंकार मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक जाधव यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.