पुणे

पुण्यात पाऊस "एक्‍सेस' 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवसभर सुरू असलेल्या रिपरिपीमुळे पुण्यात सोमवारी "एक्‍सेस' पावसाची नोंद हवामान खात्यात झाली. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पुण्यात 1 जून ते 8 जुलै या दरम्यान सरासरी 186.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या दरम्यान 294.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 107.9 मिलिमीटर पाऊस जास्त पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सरासरीपेक्षा 20 ते 59 टक्के जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्याची नोंद सरासरीपेक्षा जास्त पडलेला पाऊस म्हणून केली जाते. त्यामुळे पुण्यात "एक्‍सेस' पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात रविवारी दिवसभर पावसाच्या सरी अधून-मधून कोसळत होत्या. पण, रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या. सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण या भागात पावसाचा जोर जास्त होता. त्या तुलनेत शिवाजीनगर आणि लोहगाव येथे पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये पुण्यात (शिवाजीनगर) फक्त 7.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे याच दरम्यान 8.6 मिलिमीटर आणि पाषाण येथे 11.2 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. 

सोमवारी सकाळपासूनच पावसाच्या एकामागून एक सरी पडत होत्या, त्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत 13.5 मिलिमीटर, तर त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत 26 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. लोहगाव येथे 14 मिलिमीटर पाऊस पडला. 

पुणेकर सुखावले... 
दिवसभर पडलेल्या रिपरिप पावसाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकर सुखावले. अर्थात, रस्त्यावर जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली, वाहतुकीचा वेग मंदावला; पण पाणी कपातीचे संकट दूर जात असल्याची भावना पुणेकरांची होती. शहरात पाऊस किती पडतोय, यापेक्षा धरण परिसरात तो किती पडला, धरणातील पाण्याची पातळी किती वाढली, किती टक्के धरण भरले याबाबतची उत्सुकता पुणेकरांमध्ये दिसून येत होती. 

पुणे शहर आणि परिसरातील पावसाचा अंदाज 
9 जुलै - हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील अशी शक्‍यता 51 ते 75 टक्के 
10 जुलै - हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता 51 ते 75 टक्के 
11 जुलै - हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT