पुणे

बाह्यवळण मार्गावरील पुलाला भगदाड 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील पुनावळे येथील भुयारी मार्गाच्या पुलाला पावसामुळे दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले. महामार्गाची देखरेख व दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या गस्ती पथकाच्या दृष्टीस हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. पथकाने कॉंक्रीट टाकून दोन्ही भगदाड बुजविल्यानंतर रस्ता रहदारीस सुलभ झाला. 

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर दोन मीटर रुंदीचा दुभाजक आहे. त्यामुळे किवळे-मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे, इंदिरा कॉलेज, वाकड-भुजबळ चौक व भूमकर चौक आदी ठिकाणी तीन वर्षांपूर्वी भुयारी मार्ग केले आहेत. पुनावळेतील भुयारी मार्गामुळे पुनावळे, ताथवडे, जांबे परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे. मात्र, या भुयारी मार्गाच्या स्लॅबला पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने पावसामुळे दोन मोठी भगदाड पडली होती. स्लॅबचा भराव खचलेला होता. मार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास कॉंक्रीट टाकून भगदाड भुजविण्यास सुरवात केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी वाहने किवळे येथील मुकाई चौकापासून बाह्यवळण मार्गाने पिंपरी-चिंचवड, पुणे व साताऱ्याकडे जात असतात. तसेच एसटी, खासगी बस यासह पुणे-मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही या मार्गाने जातात. यामुळे नेहमी वर्दळ असते. भगदाड पडल्याचे सकाळी नऊच्या सुमारास लक्षात आले. मात्र, कळवायचे कुणाला, असा प्रश्‍न होता. आम्ही भगदाड पडलेल्या ठिकाणी दगड ठेवले. त्यानंतर अर्ध्या तासाने भगदाड बुजविण्यास सुरवात झाली, असे स्थानिक नागरिक मिलिंद पवार यांनी सांगितले. 

देहूरोड ते सातारा गस्त 
देहूरोड ते सातारा दरम्यानच्या रस्त्याचा ठेका आमच्याकडे आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगदाड पडले असावे, असे मुंबई-बंगळूर महामार्गाची देहूरोड ते सातारादरम्यान देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT