पुणे

अखेर ज्येष्ठाला वृद्धाश्रमाचा आधार

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुला-मुलीने सांभाळण्यास नकार दिल्यानंतर जगण्यापासून मुक्ती मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत घराबाहेर पडलेल्या वृद्धास अखेर एका वृद्धाश्रमाचा आधार मिळाला. मुंबईहून पुण्यात आलेल्या त्या निराधार वृद्ध व्यक्‍तीची जनसेवा फाउंडेशनने आपल्या वृद्धाश्रमात व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.  

अश्‍व शर्यतींसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या श्रीराम ताडेलकर यांच्याकडे पोटच्या मुला-मुलीनेच पाठ फिरविली होती. वयाच्या सत्तरीत नातेवाइकांच्या घरी काही दिवस काढल्यानंतर त्यांनी ताडेलकर यांना एसटीमध्ये बसवून दिले होते. एसटीतील सहप्रवाशांनी ताडेलकर यांच्याशी संवाद साधला त्या वेळी वास्तव पुढे आले. त्यानंतर सहप्रवाशांनी ‘स्माइल प्लस फाउंडेशन’ या संस्थेकडे मदत मागितली होती. त्या संस्थेने मदतीचा हात दिला होता. यासंदर्भात शुक्रवारी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर अनेकांनी ताडेलकर यांची विचारपूस केली.

दरम्यान, ताडेलकर यांच्याबाबत जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. डॉ. शहा यांनी ताडेलकर यांची वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था केली.  डॉ. शहा म्हणाले, ‘‘आम्ही ताडेलकर यांची वृद्धाश्रमात विनामूल्य व्यवस्था केली आहे. त्यांची तब्येत ठणठणीत आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT