वाकी (ता. बारामती) - हायड्रोकार्बनच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी बोअरवेल खोदणारे यंत्र.
वाकी (ता. बारामती) - हायड्रोकार्बनच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी बोअरवेल खोदणारे यंत्र. 
पुणे

बारामतीत हायड्रोकार्बनची शोधमोहीम

सकाळवृत्तसेवा

सोमेश्‍वरनगर - बारामती तालुक्‍यातील वाकी, मुरूम, होळ या गावांच्या शिवारात हायड्रोकार्बनचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. जालना, बीड जिल्ह्यानंतर पुणे जिल्ह्यातही यानिमित्ताने सर्वेक्षण सुरू झाले आहे. विशेषतः नीरा नदीकाठच्या गाळयुक्त पट्ट्यात शोधकर्त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. बोअरवेल घेऊन खडकांचे नमुने घेतले जात आहेत.

महसूल व वन मंत्रालयाच्या सूचनेनुसार बारामतीच्या तहसीलदारांनी तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) कंपनीला शोधमोहिमेची परवानगी दिली आहे. ओएनजीसीच्या पथकाकडून वाकी गावापासून नीरा नदीपर्यंत याचा शोध घेतला जात आहे. सुरवातीला वाकी गावात विशिष्ट प्रकारच्या वायर अंथरून सेन्सरच्या साह्याने जागा निश्‍चित केल्या. त्या जागांवर ट्रॅक्‍टरसोबत असलेल्या खोदाई यंत्राद्वारे बोअरवेल काढण्यात आले. यानंतर सदर पथकाचा मोर्चा मुरूम गावाच्या शिवारातील साळोबावस्ती, भंडलकरवस्ती, चव्हाणवस्ती या नदीकाठच्या पट्ट्याकडे वळला. होळ, आठफाटा भागातही याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. मुरूम गावच्या हद्दीत तीन-चार किलोमीटर अंतरावर विशिष्ट वायर अंथरल्या होत्या. ठिकठिकाणी बोअरवेल खोदले जात होते. ग्रामस्थ कुतूहलाने या सगळ्या कामाकडे पाहत आहे. बोअरवेलमध्ये काही अंतरावर छोटे स्फोट घडवून आणले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंतादेखील पसरली आहे. 

साळोबावस्तीवरील शेतकरी धनंजय वायाळ म्हणाले, ‘‘आठ-दहा ट्रॅक्‍टरच्या साह्याने बोअरवेल खोदत आहेत. पण त्या पथकाचा कुणालाही त्रास नाही. उलट बोअरवेलने काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले आहे. शेतकरीही सहकार्य करत आहेत.’’

तेलसाठे सापडणार?
देशातील काही गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्‍यता आहे म्हणून तपासणी चालू असल्याचे महसूल मंत्रालयाने कळविले आहे. यासाठी तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत. देशात सत्तर टक्के तेलाची आयात करावी लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी २०१६ पासून देशभरात ही मोहीम सुरू आहे. नीरा नदीच्या गाळयुक्त खोऱ्यात तेलसाठे सापडतील का, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.

तेलसाठे शोधण्यासाठी पथक आले आहे. त्यांनी गावठाणाशेजारीच बोअरवेल घेऊन काही स्फोट घडविल्याने घरांना धक्का बसण्याची चिंता वाटली. तर काही शेतकऱ्यांच्या आधीच्या बोअरवेलच्या पाण्याचे उगम बाधित होण्याचीही शक्‍यता आहे.    
- हनुमंत गाडेकर, माजी सरपंच, वाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT