I will not criticize the personally says Amol Kolhe in his speech at chakan
I will not criticize the personally says Amol Kolhe in his speech at chakan 
पुणे

Loksabha 2019 : मी छत्रपतींचा मावळा, वैयक्तिक टीका करणार नाही - अमोल कोल्हे

सकाळवृत्तसेवा

चाकण : माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. पण, मी छत्रपतींचा मावळा असून, कधीच वैयक्तिक टीका करणार नाही, असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना प्रत्युत्तर -
शिरुरमधील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच अमोल कोल्हे यांच्यावर जातीवरून टीका केली होती. तसेच त्यांनी मी निधड्या छातीचा मराठा असल्याचेही म्हटले होते. यावरून अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. चाकणमध्ये आज (रविवार) राष्ट्रवादीची सभा होत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. 

काय म्हणाले अमोल कोल्हे -
शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही उमेदवारी दिल्याबद्दल मी शरद पवार यांचे आभार मानतो. जातीपातीच्या राजकारणापलिकडे तरुणाई आला गेली आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये फरक एवढाच आहे, की त्यावेळी भ्रम करून देण्यात आला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. ही निवडणूक खासदार निवडण्याची आहे, पंतप्रधान निवडण्याची नाही. 2014 मध्ये असेच लोकांनी मतदान केले होते. माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. माझ्यावर वैयक्तिक टीका करा, पण मी छत्रपतींचा मावळा आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका केली तरी मी वैयक्तिक टीका करणार नाही. माझ्यावर टीका करून या भागातील 15 वर्षे लटकलेले प्रकल्प सुटणार आहेत का?. बैलगाडा शर्यतीचे वाट बघणारा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे का? शिरूर मतदार संघात शिवनेरी आणि संभाजी महाराज यांची समाधी आहे, मात्र पंधरा वर्षांत कधीही आलेले नाहीत.

अमोल कोल्हे यांनी केले पदव्यांचे आव्हान -
समोरून फक्त सेलिब्रिटी आणि अभिनेता इतकीच टीका होत आहे. ते माझे मित्रच आहेत. पण त्यांना माझी पूर्ण ओळख करून देत आहे. (आतापर्यंतचा स्वतःचा लेखाजोखा मांडला) कारण या आधीचे उमेदवार बोलू शकत नाहीत, त्यांचं शिक्षण नाही मग म्हटले उमेदवार तोडीचा नाही. मी माझ्या पदव्या आणतो तुम्ही तुमच्या पदव्या आणा, आहे का हिम्मत. आता मी तुमच्यासमोर उभा आहे. माझा फोटो घ्या आणि दाखवा सर्वांना मग सांगतील उमेदवार कसा तोडीस तोड आहे ते, असे थेट आव्हान कोल्हे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT