if you organize your schedule will get best marks in exam al deshmukh
if you organize your schedule will get best marks in exam al deshmukh Sakal
पुणे

Time Management : योग्य नियोजन केल्यास परिक्षेत उत्तम गुण मिळवणे शक्य - अ.ल.देशमुख

मिलिंद संगई, बारामती.

Baramati News - दहावीच्या परिक्षेत उत्तम गुण संपादन करायचे असतील तर कष्ट, प्रयत्न व अभ्यास महत्वाचा आहे, योग्य नियोजन केले तर उत्तम गुण मिळवणे अवघड नाही, असा कानमंत्र ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ.ल.देशमुख यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.

निमित्त होते सकाळ विद्या व कोटाची सर्वोत्तम मोशन अँकेडमीच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमात जेईई व नीट मार्गदर्शक नीरज कुमार यांनीही विद्यार्थ्यांना दहावीनंतर करिअरसाठी काय केले पाहिजे याची माहिती दिली.

रविवारी (ता. 7) बारामतीतील मुक्ताई लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. मोशन अँकेडमीचे पांडुरंग फुंदे, डॉ. राजेंद्र लोढा, तसेच संदीप पवार उपस्थित होते.

नीरजकुमार म्हणाले, करिअर निवडताना योग्य दिशा सर्वात महत्वाची असते. ज्या विषयात आपण कच्चे आहोत, त्या विषयाचा अधिक अभ्यास करायला हवा. करिअरबाबत जो निर्णय घेऊ त्यावर पूर्णपणे फोकस करायला हवे. आयुष्यात टॉप येण्यापेक्षा दिशा निश्चितीला महत्व द्यायला हवे.

या प्रसंगी आयआयटीला निवड झालेल्या ऋषभ लोढा याचा सत्कार केला गेला. त्याच्यासह त्याची आई उज्वला लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप पवार यांनीही या प्रसंगी कोटा पॅटर्न बारामतीत सुरु करीत असल्याचे सांगितले.

आयआयटी, एनआयटी, ट्रीपलआयटी या बाबत त्यांनी माहिती दिली. सकाळचे जाहिरात व्यवस्थापक दत्तात्रय मारकड, रमेश शिंदे, सहायक वितरण व्यवस्थापक मनोज काकडे, बातमीदार कल्याण पाचांगणे व सहायक महादेव जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

अ.ल.देशमुख यांनी दिल्या या टीप्स

• तोंडी परिक्षेची घरी तयारी करायची

• वाचन, लेखन व संभाषण उत्तम करायचा प्रयत्न करणे

• स्कोअरिंग असलेल्या विषयात अधिक गुण मिळवावेत

• आपल्या क्षमतेचा विचार करुन अभ्यास करावा

• टार्गेट सेट करुन अभ्यासाची दिशा ठरवा

• सखोल वाचन करा, पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवा

• आकलनासहीत वाचन करण्याची सवय लावा

• उपयोगिता लेखनाचा सराव करा

• कृतीपत्रिका समजून घ्यायला हवी

• सत्तर टक्केप्रश्न स्वाध्यायावर असतात, स्वाध्यायाचे अध्ययन करा

• दोन महिन्यात पुस्तकांचे सखोल वाचन करा.

• ग्रामरची रिव्हिजन करा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT