Car-Accident 
पुणे

पुरामुळे वाहनाचं नुकसान झालंय? असा मिळवा 'इन्श्युरन्स क्लेम'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठी तसेच नाला परिसरात असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या गाड्यांची नुकसान भरपाई कशी मिळवायची? या नुकसानीची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का? असा प्रश्न या वाहनधारकांना पडला आहे.

पण काळजी करण्याचे काही कारणा नाही. आपल्या गाडीचा जर विमा काढलेला असेल, तर तिची मूळ किंमत आणि तिचा आतापर्यंत झालेला वापर विचार करून वाहनधारकांना ठराविक रक्कम विमा कंपनी देत असते. रक्कम देताना विमा कोणत्या स्वरूपाचा आहे, याचा विचार केला जातो.

जर तुमची गाडी नवीन असेल, तर तुमच्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे 'काँप्रेहेन्सिव्ह रिस्क कव्हर' इन्शुरन्स कंपनीने घेतलेली असते. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल, तर गाडीचा विमा काँप्रेहेन्सिव्ह असेल, याची खात्री बाळगा कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते. केवळ विम्याचा हप्ता (प्रीमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त 'थर्ड पार्टी' इन्शुरन्स घेतलेला असेल, तर पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देणार नाही, अशी माहिती ऍड. अतुल गुंजाळ यांनी दिली.

गाडीचा विमा सर्वसमावेशक आहे तर काय कराल?
गाडी जागेवरच उभी असेल, तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल, तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्प लाइनवर फोन करून तुमचे नाव, पॉलिसी नंबर आणि गाडीचे लोकेशन कळवा. कंपनीकडून सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेईल.

जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल, तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात दुरुस्त होईल.

गाडी त्वरित दुरुस्त करण्याच्या नादात एक मोठी चूक तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे, सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्नीशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे. हे जर तुम्ही केलेत, तर गाडीचे इंजिन 'हायड्रोलॉक' होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरू होताना इंजिनमध्ये पाणी घुसेल आणि गाडीचे इंजिन सीझ होईल. इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजिनचे नुकसान 'कॉन्सिक्वेंशिअल लॉस ' म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान' या सदरात जाईल.

परिणामी, इंजिनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही. एकूण नुकसानीत इंजिन हाच मोठा खर्च असतो. तोच मिळाला नाही,  तर इतर नुकसान भरपाई मिळूनही काहीच फायदा होणार नाही.

पाण्यात बुडलेली गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू नका : 
हायड्रोलॉकिंगचा धोका साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यात उद्भवू शकतो, अशा परिस्थितीतही इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही. जर अ‍ॅड-ऑन 'म्हणून इंजिनचा स्वतंत्र विमा त्याच पॉलिसीत घेतला असेल, तर ही कॉन्सिक्वेंशिअल लॉस अट लागू पडत नाही, अशी माहिती विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सुनील द्रविड यांनी दिली.

गाडी पंचर झाली असेल, तर ती टो करूनच न्यावी. कारण गाडीची रिंग खराब झाली, तर ती विम्यात कव्हर होत नाही. तसेच गाडी मालकाने गाडीत काही इलेक्ट्रॉनिक बदल केले असतील, तर ते देखील कवर होत नाहीत. (उदाहरणार्थ, गाडीला केलेली लाइटिंग)

आणखी महत्त्वाच्या बातम्या : 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT