मीडियाशी बोलताना, शरद पवारांनी मानले कोणाचे आभार?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्यानंतर आज, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण, मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा विचार करून, तेथे न जाण्याचे आवाहन केल्यानंतर पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, या काळात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभार मानले.

शरद पवारांपुढे 'ईडी' बॅकफूटवर

कोणा कोणाचा पाठिंबा?
शरद पवार यांच्यावर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सकाळी ट्विट केले होते. तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांनी पवारांना याप्रकरणी पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर पवार म्हणाले, ‘माझ्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह मला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचेही आभार मानतो.’ महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. पवार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

...म्हणून ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

काय म्हणाले पवार?
पवार म्हणाले, की मुंबईचे पोलिस आयुक्त माझ्याकडे आले होते. अनेक लोक माझ्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्तांनी हीच माहिती मला दिली. माझ्या एका निर्णयामुळे सामान्य माणसामुळे त्याची किंमत मोजावी लागू नये म्हणून मी ईडी कार्यालयात जाणार नाही. मला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी, मनमोहनसिंग, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांचे मी आभार मानतो. आता मी पुणे, बारामतीत निर्माण झालेल्या पुरस्थितीचा आढावा घेणार असून, पाहणी करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar said thanks to congress shivsena for support ed