...म्हणून ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

महाराष्ट्र राज्य गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर बारामती येथे जाणार असल्याचे सांगितले.

मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर बारामती येथे जाणार असल्याचे सांगितले.

शरद पवारांपुढे ईडी बॅकफुटवर; चौकशीची गरज नसल्याचे पाठवले पत्र

पवार म्हणाले, की 24 तारखेला मी एका पत्रकार परिषदेत आपल्याला असे सांगितले होते आज मी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना काही विनंती करणार आहे. विनंतीचे स्वरुप असे होते की त्यांनी महाराष्ट्र राज्य बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला. ज्या बँकेचा संचालक मी कधीच नव्हतो. त्यामध्ये माझे नाव कसे घेतले. या संदर्भात हवे ते सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. निवडणुका जाहीर झाल्याने मी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे पुन्हा मी मुंबईत येणार नाही. परंतु हा निर्णय विरोधी पक्षातील नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी घेण्यात आला होता. या बाबतीत लेखी सूचनाही मी ईडीला दिली होती. त्यांच्याकडून उत्तर आले की तुम्ही येथे येण्याची आणि चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे. गरज पडली तर फोनवरून सूचना देऊ, असे म्हटले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त माझ्याकडे आले होते.

‘ईडीने झोपलेल्या राष्ट्रवादीला जागं केलं’

अनेक लोक माझ्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्तांनी हीच माहिती मला दिली. माझ्या एका निर्णयामुळे सामान्य माणसामुळे त्याची किंमत मोजावी लागू नये म्हणून मी ईडी कार्यालयात जाणार नाही. मला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar points out a reason for not going to Enforcement Directorate