Leopard calf sakal
पुणे

Leopard Calf : सततधार पावसामुळे बिबट मादी पासून दुरावला; नवजात बछडा आईच्या विरहाने व्याकुळ

सततधार पावसामुळे बिबट मादी पासून नवजात बछडा दुरावला.

रवींद्र पाटे

नारायणगाव - सततधार पावसामुळे बिबट मादी पासून नवजात बछडा दुरावला आहे. आईच्या विरहाने व्याकुळ झालेला बछडा पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील शेतकरी महेश खांडगे यांच्या घराजवळ आला. खांडगे यांनी बछड्याला वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या ताब्यात दिले. बछडा दहा ते वीस दिवसांचा असून मादी जातीचा आहे.

अन्न न मिळाल्यामुळे तो अशक्त झाला होता. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात बछड्याला दूध पाजल्यानंतर तो तरतरीत झाला असून त्याच्या मूळ स्वभावानुसार आता तो गुरगुरायला लागला आहे. बछड्याला पुन्हा मादीच्या ताब्यात देण्यासाठी आज रात्री प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

पिंपळगाव तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वाणीमळा शिवरात महेश खांडगे कुलस्वामी रोपवाटिका आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना बछडा घराजवळ दिसून आला. पावसामुळे बछडा गारठला होता.

खांडगे यांनी याबाबतची माहिती जुन्नर वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना दिली. पवार व भुजबळ आणि तातडीने घटनास्थळी जाऊन बछड्याला ताब्यात घेतले. अन्न न मिळाल्यामुळे व पावसाने भिजल्यामुळे बछडा अशक्त झाला होता.

बछड्याला उपचारासाठी तातडीने माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. डॉ. महेंद्र ढोरे यांनी बछड्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अन्न पाणी दिल्यानंतर बछडा तरतरीत झाला असून तो आता गुरगुर करत आहे. घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैदय डॉ. महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री ट्रॅप कॅमेरा लावून बछड्याला मादीच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ट्रॅप कॅमेरामुळे मादी बछड्याजवळ येताच मोबाईलद्वारे दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT