पुणे

Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्‍का वाढणार

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019  
पुणे - लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाने बरेच प्रयत्न करूनही शहरातील आठ मतदारसंघांमध्ये निम्म्या मतदारांनीच मतदानाचा हक्‍क बजाविला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढेल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त मतदान झाले होते. वडगाव शेरी आणि शिवाजीनगर या मतदारसंघांत सर्वाधिक कमी मतदानाची नोंद झाली होती. मतदानाबाबत जागृती व्हावी आणि मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्‍ट्रॉल पार्टिसिपेशन’च्या (स्वीप) माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात मतदारांची एकूण संख्या ७७ लाख २६ हजारांवर  पोचली आहे.  

जिल्हा प्रशासनाकडून ‘स्वीप’च्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. शाळा-महाविद्यालयांसह गर्दीच्या ठिकाणी मतदान जागृतीबाबत उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. मतदानाची टक्‍केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- नवल किशोर राम, जिल्हा निवडणूक अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT