पुणे

बालेवाडी, बाणेर, पाषाणच्या नागरिकांना वाढीव वीजबिलामुळे धक्का

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे पुणे शहर व परिसरातले सगळे व्यवहार ठप्प झाले. नागरिकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होऊन बसले, अशा परिस्थितीत महावितरणनेही मीटर रीडिंग घेतले नाही. त्यामुळे वीजबिलाच्या सरासरीनुसार बिल देण्यात आले. याचा परिणाम म्हणजे जून महिन्यांमध्ये नागरिकांना वाढीव बिले आल्यामुळे नागरिक हादरून गेले. या पैकी बाणेर, बालेवाडी, पाषाण येथील तब्बल 200 नागरिकांनी, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी बाणेर येथील महावितरणच्या अभियंत्याकडे वीजबिल कमी करण्याची विनंती केली आहे.     

यासंदर्भात महावितरणचे बाणेर कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अनिल हुलसुलकर म्हणाले, की मार्चमध्ये लॉकडाउनला सुरुवात झाली. त्यातच एप्रिलमध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाकडून विजेचे दरही वाढविण्यात आलेले. लॉकडाउनमुळे महाविरणला मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे महावितरणकडून मीटर रीडिंगचे फोटो काढून पाठविण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. ज्या नागरिकांनी मीटर रीडिंग पाठवले त्यांना त्यानुसार बिल आकारले गेले. पण ज्यांनी रीडिंगचे फोटो दिले नाही, त्यांना मात्र  सरासरीनुसार वीजबिल देण्यात आले. जूनमध्ये प्रत्यक्ष घेतले गेलेले सरासरी आणि प्रत्यक्ष वापरलेले युनिट यांची वजावट करूनच बिल देण्यात आली आहे. तरी ज्यांना बिल देणे शक्य असेल, त्यांनी ते भरावे. त्यांना दोन टक्के सूट दिली जाणार आहे; तर ज्यांना बिल भरता येणार नाही, अशांनी टप्प्याटप्प्याने भरावे कोणत्याही कारणाने नागरिकांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही.       

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा     

मार्चपासूनचे वीजबिल नियमितपणे भरले, तरीही जूनमध्ये आम्हाला 600 युनिट वीजबिल आकारण्यात आले आहे, हे पाहून मला धक्काच बसला. महावितरणकडून काहीतरी उपाय योजना करून बिल कमी करण्यात यावे.
- प्रियांका दाते, पीओनी सोसायटी, बाणेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT