Sickness 
पुणे

सर्दी, ताप, खोकला रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेल्या काही दिवसांमध्ये ढगाळ हवामानामुळे वायसीएम रुग्णालयामध्ये सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. 

बदलत्या हवामानामुळे गेले काही दिवस ढगाळ हवामान आहे, त्यातच दोन-तीन वेळा पावसाच्या हलक्‍या सरीही पडल्या. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी वायसीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी गर्दी होत आहे. तसेच, खासगी रुग्णालयांमध्येही अशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे काही खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. 

या संदर्भात वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ‘‘ढगाळ हवामानामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा रुग्णांनी आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. हवामान बदलामुळे तहान लागण्याचे प्रमाण कमी-अधिक होते, तरीसुद्धा अशा रुग्णांनी दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्यावे. त्याचप्रमाणे व्यायाम करणारे, कष्टाचे काम करणाऱ्यांनी पाणी अधिक प्यावे. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.’’ डॉ. किशोर खिलारे म्हणाले, ‘‘बदलत्या हवामानाचा त्रास हा दमा आणि श्‍वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना होतो. अशा रुग्णांनी औषधे वेळेवर घ्यावीत. गारठा असल्यास तोंडाला आणि कानाला जाड रुमाल बांधावा. पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.’’ खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यास दम्याचा त्रास उद्‌भवू शकतो. त्याचप्रमाणे खोकल्यासोबत ताप असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar Video: काय सांगताय? माझी ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार घरी आले होते... महागुरू सचिन पिळगावकरांचा नवीन किस्सा

Pune Fraud: 'उदापूर येथील एकाची साडे तेरा लाखांची फसवणूक';स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष, महिलेने घातला गंडा

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अपघाताची मालिका सुरू

Lakshmi Yoga: या आठवड्याची सुरुवात लक्ष्मी योगाने होणार, वृषभ, तुळासह 'या' राशींना मिळेल आर्थिक समृद्धी; जाणून घ्या करिअरची ग्रहस्थिती

Ahilyanagar News: 'उमेदवारी मिळण्यासाठी नेतेमंडळीकडे लॉबिंग'; गाठीभेटी झाल्या सुरू, सोशल मिडीयावर रील्स व्हायरल

SCROLL FOR NEXT