HarshBharne
HarshBharne 
पुणे

राष्ट्रवादीचे नेते इंदापुरात काय बोलणार?

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे मंगळवारी (ता. 27) इंदापूर तालुक्‍यात आगमन होणार आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते काय बोलणार, याकडे तालुक्‍यातील जनतेसह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य जाहीर सभा होणार आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांच्या भाषणाच्या तोफा धडाडणार आहेत.

राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण होणार आहे. 30 एप्रिल 2018 रोजी अजित पवार यांनी अंथुर्णे येथील शेतकरी मेळाव्यामध्ये "वाटेल ते झाले तरी इंदापूरची राष्ट्रवादीची जागा सोडली जाणार नाही, भले आघाडी नाही झाली तरी बेहतर,' असा शब्द दिला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्यामध्ये "कॉंग्रेसच भरणे मामांचा प्रचार करेल, लय चिंता करू नका...', असे वक्तव्य केले होते. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून वादंग सुरू झाला होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नसल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातून अनेक दिग्गज भाजप-सेनेमध्ये जात आहे. जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे तीन आमदार असून, यामध्ये इंदापूरच्या दत्तात्रेय भरणे यांचा समावेश आहे. इंदापूरचा गड राखण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेची सभा जोरदार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

नियोजनासाठी आज बैठक

शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजनासाठी शनिवारी (ता. 24) आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीच सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थित नियोजनाची बैठक आयोजित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT