Indian navy is playing important role in the war against Corona
Indian navy is playing important role in the war against Corona 
पुणे

Corona Virus : कोरोना विरुद्धच्या लढाईत नौदल 'असे' बजावतोय महत्वाची भूमिका

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संशयित व कोरोनाबाधित रुग्णांचा घशातील द्रवाची (स्वॅब) चाचणीचा वेग पण वाढला आहे. तर अशा चाचण्या गोवा राज्यासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये नौदल हे मोठी भूमिका बजावत असून, गोव्यातील नमुने चाचणीसाठी पुण्यात आणत आहे. तसेच ते पुन्हा घेऊन जाण्याचे कार्य सक्षमपणे करत आहे.

गोवा राज्यात कोविड 19 च्या चाचणीसाठी सक्षम सुविधा उपलब्ध नसल्याने नौदलाचा उड्डाण तुकडीतर्फे (नेव्हल एव्हीएशन) बाधित व संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेत चाचणीसाठी आणले जात आहेत. तसेच चाचणी नंतर पुन्हा हवाइमार्गाने घेऊन जाण्याचे कार्य सुरू आहे.

देशभरात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे पूर्ण वाहतूक साधने बंद झाली आहेत. त्यामुळे गोवा राज्यसरकारने यासाठी नौदलाची मदत घेतली आहे. गोव्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावला रोखण्यासाठी वैद्यकीय साधने व चाचणी केंद्राच्या उभारणीसाठी काही दिवसांपूर्वी गोवा मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सॅव्हीयो रौड्रीगेजच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांचे पथक एनआयव्हीत प्रशिक्षणासाठी आले होते. या पथकाला नौदलाच्या विमानात आणण्यात आले होते. 

सध्या गोवा येथे चाचणी केंद्र स्थापनेच्या मदतीसाठी एनआयव्हीतील तज्ज्ञांची एक तुकडीदेखील नौदलाच्या मदतीने गोव्यात दाखल झाली असल्याची माहिती, नौदल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Kiran Mane: "सुषमा अंधारेताईंनी हा पर्दाफाश केला तेव्हा...", राज ठाकरेंच्या व्हायरल पत्राबाबत किरण मानेंची पोस्ट; नेत्यांना म्हणाले...

Weather Update: पुणे, मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पाऊस लावणार हजेरी; तर उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

लहान मुलांना सारख्या उचक्या का येतात? जाणून घ्या कारण आणि उपाय

SCROLL FOR NEXT