44_1078_964_1832.jpg
44_1078_964_1832.jpg 
पुणे

स्वच्छ सर्वेक्षणातील अपयशास जबाबदारांची चौकशी; सजग नागरिक मंचची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे :  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले पुणे शहर या वर्षी ३७ व्या क्रमांकावर गेले. या सर्वेक्षणात राज्यातही पुणे शहराने गेल्या वर्षीचे दुसरे स्थान गमावले आहे. राज्यात या वर्षी शहर आठव्या क्रमांकावर आहे. याबाबत सजग नागरिक मंचाने, ''पुणे महापालिकेने या स्पर्धेसाठी सल्लागारांसह अनेक दिखाऊ बाबींवर पुणेकरांच्या करांच्या पैश्यातून केलेल्या खर्चाचा लेखा जोखा जाहीर होण्याची तसेच या अपयशासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

याबाबत सजग नागरिक मंचाने महापालिकेच्या कारभारावर टिका केली., स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेचा ३७ व्या क्रमांक.हे निश्चितच चिंताजनक आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिकेने या सर्वेक्षणासाठी भरपूर तयारी केली असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांच्या करांचे लाखों रुपये खर्च करून एक सोडून दोन, दोन मोठ्या कंपन्यांना यासाठी सल्लागार नेमले होते. दोन, दोन क्लास लावल्यामुळे जसा मुलाचा पहिला क्रमांक येऊ शकत नाही, तसंच दोन, दोन सल्लागार नेमूनही पुणे शहर सर्वेक्षणात पहिल्या २५ मध्ये सुद्धा येऊ शकले नाही.

केवळ बादल्या, बेंच, कापडी पिशव्या, वाटून पहिला क्रमांक येईल, असा गोड गैरसमज असणाऱ्या प्रशासनाला व राजकीय नेतृत्व यांना वंदन. केवळ भिंती रंगविणे आणि दिखाऊ कामे करणे या मुळे पहिला क्रमांक येईल असा भ्रम ज्या अधिकाऱ्यांनी निर्माण केला त्यांचीही या निमित्ताने चौकशी होणे गरजेचे आहे. पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवून सल्लागार नेमल्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले, हे ही लक्षात घेण्याची गरज आहे.

एकुण कचरा प्रकल्पांवर शेकडो कोटी रुपये खर्च करून ही त्यांची असलेली दुरावस्था, कचरा नागरिकांकडून गोळा करताना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे बंधन घालून नंतर तो एकत्र करून वाहतूक करण्याची किमया, यामुळे नागरिकांचा उडालेला विश्वास या सर्वांमुळेच हे अपयश आहे, हे निर्विवाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT