Yoga-Teacher-Trainer.Jpg
Yoga-Teacher-Trainer.Jpg 
पुणे

International Yoga Day 2019 : झोपडपट्ट्यांतील मुले देताहेत परदेशात योगशास्त्राचे धडे 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन "करिअर ऑप्शन' म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हॉंगकॉंग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत. 

पाच वर्षांपासून जगभरात 21 जून "जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो. पाच वर्षांमध्ये योगशास्त्राचा अभ्यास हा एक नवीन करिअरचा पर्याय म्हणून तरुणांपुढे येत आहे. एक वेळचे जेवण कसेबसे मिळत असलेल्या पुण्यातील झोपडपट्ट्यांतील मुलांनी चिकाटीने योगशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. त्यातून ही मुले आता वेगवेगळ्या देशांमध्ये योग शिक्षक म्हणून तेथील नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. 

याबद्दल बोलताना योगतज्ज्ञ डॉ. पल्लवी कव्हाणे म्हणाल्या, "झोपडपट्टीत राहणारी मुले योगासनाच्या सरावासाठी माझ्याकडे येत होती. शाळा-कॉलेजचे शिक्षण घेतानाही त्यांची योगासनातील आवड कायम राहिली. त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रातील वेगवेगळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. भारतातील योग शिक्षकांना जगभरात महत्त्व आहे. कारण, योग हे भारताचे मूळ आहे. त्यामुळे योगशास्त्र हे भारतीय लोकांकडूनच जास्त चांगल्या प्रकारे शिकविले जाईल, असा विश्‍वास आहे. त्यातून भारतीय योग शिक्षकांना जगभरात मागणी आहे.'' 

"सध्या परदेशात योगाचे धडे देणारी ही मुले सरावासाठी महाराष्ट्र मंडळात येत असत. त्यांची अशी परिस्थिती नव्हती, की ते एकवेळचे जेवण करू शकतील. पण, ते आज परदेशात एक ते दीड लाख रुपये वेतन घेतात,'' असेही डॉ. कव्हाणे यांनी स्पष्ट केले. 
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT