digital-health 
पुणे

कोरोनामुळे ‘डिजिटल हेल्थ’ची होणार भरभराट

सम्राट कदम -सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे रुग्णालयांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल झाला आहे. भविष्यात सर्वसाधारण आरोग्यसेवेसह टेलिमेडिसीन आणि डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात मोठी गुंतवणूक वाढेल, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

शारीरिक अंतर, नागरिकांची बाहेर पडण्याची भीती, ऑनलाइन ओपीडी, निदान आणि संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना यामुळे आरोग्यसेवेत नजीकच्या काळात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. 

यासंबंधी रूबी हॉल क्‍लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले,‘‘कोविडमुळे जास्त ठिकाणी संपर्क टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टेलि मेडिसीन, टेलि रेडीओग्राफी, टेलि फार्मसी अशा क्षेत्रांत वाढ तर होईलच. पण त्याचबरोबर यासंबंधीचे संशोधन, साहित्य निर्मिती क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे.’’ इंडिया ब्रांड इक्विटी फाउंडेशनच्या मार्च २०२० मधील अहवालानुसार २०२२ पर्यंत आरोग्यसेवेतील उलाढाल ३७२ अब्ज डॉलर पर्यंत जाणार आहे. 

ही क्षेत्रे विस्तारणार
हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम, टेलि हेल्थ, इलेक्‍ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड आदी
२०२२ पर्यंत ९.६ अब्ज यूएस डॉलरची उलाढाल अपेक्षित

मोबाईल हेल्थ
हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम, टेलि हेल्थ, इलेक्‍ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड आदी
२०२२ पर्यंत ९.६ अब्ज यूएस डॉलरची उलाढाल अपेक्षित

घरगुती उपचार
संसर्ग टाळण्यासाठी डॉक्‍टर आणि परिचारिकांना घरीच बोलावणार
रिमोट मॉनिटरिंग, मोबाईल तंत्रज्ञानाचा निदान, चाचण्या आणि औषध खरेदीसाठी वापर

संशोधन
करारबद्ध संशोधनात वाढ
औषध निर्मितीचा आणि चाचणीचा खर्च अमेरिकेपेक्षा ६० टक्‍क्‍यांनी कमी
पारंपरिक, आयुर्वेदिक संशोधन संस्थाची स्थापना

वैद्यकीय पर्यटन
मेडिकल व्हिसा सहज झाल्यामुळे २०१८-१९ मध्ये दुपटीने वाढ
२०२० मध्ये ९ अब्ज डॉलरची उलाढाल?
शस्त्रक्रियेचा खर्च दहा पटीने कमी होणार

आरोग्य क्षेत्रामध्ये ८० टक्के वाटा खासगी क्षेत्राचा आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने लोकांचा सरकारी आरोग्य सेवेवरील विश्‍वास वाढविणे गरजेचे आहे. कोरोनाचे धडे लक्षात घेता खासगी आणि सरकारी आरोग्यसेवेचा समन्वय, तसेच गुंतवणूक साधणे गरजेचे आहे.
- डॉ. संजय पठारे, वैद्यकीय संचालक, रुबी हॉल क्‍लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिव-शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT