पुणे

यंदा गरिबांची दिवाळी गोडधोड फराळाविनाच 

सकाळवृत्तसेवा

पुणे : दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, शहरातील एकाही रेशन दुकानात साखर, पामतेल आणि डाळींचा अद्याप पत्ता नाही. निविदा प्रक्रियेतील संथ कारभार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गरीब जनतेवर यंदाची दिवाळी गोडधोड फराळाविनाच साजरी करण्याची वेळ आली आहे. 

दिवाळीनिमित्त अनेकांच्या घरी सध्या लाडू, करंजी, चकली, चिवडा अशी फराळ तयार करण्याची लगबग सुरू असते. रेशन दुकानावर अवलंबून असलेल्या दारिद्य्र रेषेखालील आणि अंत्योदय योजनेसह अन्य शिधापत्रिकाधारकांची संख्या पावणेतीन लाखांच्या आसपास आहे. त्यांना रेशनवर साखर, तेल आणि डाळ कधी येणार, याची वाट बघत बसण्याची वेळ आली आहे. 

दिवाळीनिमित्त नोव्हेंबर महिन्यासाठी दोन हजार 618 क्‍विंटल साखरेचा कोटा मंजूर करण्यात आला. परंतु केवळ एक हजार 220 क्‍विंटलच साखर गोदामात आली आहे. यंदा सरकारने तूर डाळीव्यतिरिक्‍त चनाडाळ आणि उडीद डाळही देण्याचे नियोजन केले आहे. परंतु कोणतीही डाळ रेशन दुकानात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात घरी डाळ कधी शिजणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

रेशनवरील मीठ "आळणीच' 
रेशन दुकानावर पुरेशी साखर आलेली नाही. मात्र, 340 क्‍विंटल मीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मीठ खरेदीसाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे रेशनवरील मीठ "आळणीच', असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

पुण्यातील रेशन दुकान - 854 
एकूण शिधापत्रिकाधारक - 9 लाख 86 हजार 697 
प्रत्यक्षात धान्य मिळणारे शिधापत्रिकाधारक - तीन लाख 65 हजार 283 

दिवाळीत रेशनवर उपलब्ध होणारे धान्य आणि दर (प्रतिकिलो) 
साखर - प्रतिकार्ड एक किलो, दर - 20 रुपये 
तूर, चना आणि उडीद डाळ - प्रतिकार्ड एक किलो, दर 35 रुपये 
गहू - दर दोन रुपये 
तांदूळ - दर तीन रुपये 

"साखरेच्या एकूण कोट्यापैकी जवळपास निम्मी साखर गोदामात आली आहे. साखरेचे वाटप लवकरच सुरू करण्यात येईल. परंतु पाम तेलासह डाळी अद्याप आलेल्या नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत डाळी येणे अपेक्षित आहे.'' 
- विश्‍वनाथ विरनक, सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT