MLA Atul Benke
MLA Atul Benke Sakal
पुणे

जुन्नर बिबट सफारीचा प्रश्न मार्गी; आमदार बेनकेंची माहिती

रवींद्र पाटे

नारायणगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नरच्या बिबट सफारीसाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले असून. जुन्नरच्या बिबट सफारीसाठी जूनच्या पुरवणी मागण्यात निधी देतो असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहे. या मुळे जनतेच्या मनातील जुन्नर बिबट सफारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. आशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात बिबट सफारीसाठी साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र ही बिबट सफारी बारामती तालुक्यात होणार असल्याने जुन्नरची बिबट सफारी बारामतीला नेली. असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाले. या मुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले. विविध पर्यटन संस्थांनी जुन्नर बिबट सफारीसाठी सह्यांची मोहीम, पत्रव्यवहार सुरू केला होता. बिबट सफारीच्या मागणीसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनात

बिबट सफारी बाबत आक्रमक भूमिका घेतली होती.या मुळे

बिबट सफारी बाबत काय निर्णय होतो. आमदार बेनके नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.या बाबत आमदार बेनके म्हणाले आज सकाळी साडेआकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. बैठकिला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी आंबेगव्हान येथिल बिबट सफारी बाबत चर्चा झाली. माजी आमदार सोनवणे यांच्या कार्यकाळात सन २०१६ -२०१७ दरम्यान आंबेगव्हान येथे बिबट सफारी बाबतचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने

बिबट सफारी बाबत पुढे काहीच हालचाल झाली नाही. आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी वनविभागाची योग्य जागा पाहून तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यास जूनच्या पुरवणी मागण्यात जुन्नर बिबट सफारीसाठी निधी देण्याचे आश्वासन या वेळी त्यांनी आमदार बेनके यांना दिले.आज शिवजयंती व जागतिक वनदिन आहे.या शुभमुहूर्तावर आज जुन्नर बिबट सफारीचा प्रश्न मार्गी लागल्याने मी आनंदीत आहे.

फोटो : आमदार अतुल बेनके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT