महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेची किल्ले शिवनेरीवर सांगता
महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेची किल्ले शिवनेरीवर सांगता sakal
पुणे

महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेची किल्ले शिवनेरीवर सांगता

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : जुन्नर येथील घन:श्याम केळकर यांनी वर्षापूर्वी रायगडाहून पायी सुरू केलेल्या महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेची रविवारी ता.१७ रोजी किल्ले शिवनेरीवर यशस्वी सांगता झाली.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी झालेल्या सांगता सोहळ्यास निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक, निवृत्त अप्पर सचिव शामकांत पारनाईक, प्रा.अमेय महाजन, शिवाजी ट्रेलचे विजय कोल्हे, प्रशांत केदारी, प्रवीण फल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

केळकर यांनी, सरकारमार्फत राज्यातील सर्व कुटुंबांना आरोग्यविमा देण्यात यावा यासाठी परिक्रमेत जागृती केली. याबरोबर घरातील आजारपणामुळे ज्या कुटुंबांवर मोठे आर्थिक, मानसिक संकट कोसळते. त्याकाळात त्यांना मदतीचा हात देण्याची व्यवस्था प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यात उभी करणे हा या परिक्रमेचा उद्देश ठेवून यासाठीआरोग्यदान www.aarogyadaan.org या वेबसाईटच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाचे संकट, नैसर्गिक अडथळे, शारिरीक दुखापती, मानसिक अस्वस्थता या सगळ्यांवर मात करत केळकर यांनी २७ जिल्ह्यातून चार हजार किलोमीटर पायी प्रवास ३६५ दिवसांत पूर्ण करताना १७० ठिकाणी मुक्काम केला. त्यांच्या ह्या महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेच्या कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशन समारोप प्रसंगी करण्यात आले.

सुरेश खोपडे म्हणाले, घनश्याम केळकर यांच्या परिक्रमेच्या निमित्ताने एका नवीन कार्याचा आज उदय होत आहे. मी या योजनेचा पाठीराखा होतो.राजकीय व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला त्याचा भाग व्हावा लागेल. भारतीय शिक्षण पध्दती कालबाह्य झालेली आहे. आम्ही मोरगाव येथे कुडाची शाळा सुरू केली आहे. सूत्रसंचालन विनायक खोत यांनी केले. घनश्याम केळकर यांनी आभार मानले.

"आरोग्य क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ता उभा करावा या स्वप्नाच्या मागे जात केलेली ही पायपीट. यामध्ये किती यश मिळाले हे पहाण्यासाठी अजून काही काळ थांबावे लागेल. वर्षभरात हजारो लोकांपर्यंत ही संकल्पना पोचविण्याचे काम निश्चितच झाले आहे. रुग्णसेवेचे हे बीज अनेकांच्या मनात रुजले गेले आहे."

- घनश्याम केळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT