पुणे

जुन्नरला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वस्तूंच्या उत्पादनावर बंदी घालणार - शाम पांडे

दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नर नगर पालिका प्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर बंदी घालणार असून त्यासाठी अशा व्यावसायिकांची बैठक घेऊन पुढील निर्णय  घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या सभेस उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, गटनेते दीपेश परदेशी, दिनेश दुबे, जमीर कागदी, नगरसेवक समीर भगत, अवीन फुलपगार, भाऊ कुंभार, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, फिरोज पठाण, सना मंसुरी, मोनाली म्हस्के, अश्विनी गवळी, अक्षय मांडवे आदी नगरसेवक तसेच मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 
या सभेत स्वच्छता विषयास मंजुरी देण्यात आली. शहरात वाहनतळ पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले. व्यापारी संकुलातील गाळ्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजपत्रकानुसार सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT