Kasba bypoll election Allegation of distribution of money for voting Ganj Peth former BJP corporator politics
Kasba bypoll election Allegation of distribution of money for voting Ganj Peth former BJP corporator politics Sakal
पुणे

Kasba Bypoll Election : मतदानासाठी पैसे वाटपाचा आरोप; गंज पेठेत दोन गटात वाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटपावरून झालेल्या वादातून दोन गटात वाद झाले. पैशांचे पाकीट न घेतल्यावरून भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गंजपेठेत शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

वाद झाल्यानंतर दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलिस चौकीसमोर मध्यरात्रीपर्यंत ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात दोन्ही गटातील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला. खडक पोलिस ठाण्यात नीता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांच्या तक्रारीवरून विष्णू हरीहर, निर्मल हरीहर, हीरा हरीहर व इतर १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर, हिरालाल नारायण हरीहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार घरी असताना विष्णू हरीहर तसेच इतर १५ ते १६ जण आले. त्यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरून त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की केली.

तुला लय माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी कुणालला लाकडी फळीने मारले व सावधान मित्र मंडळाच्या मागे मोकळ्या पटांगणात मावशीच्या हातावर, पोटावर ठोसा मारला.

तक्रारदार सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गंजपेठ पोलिस चौकीसमोर जमले. त्यांनी ॲट्रासिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

तर, हिरालाल नारायण हरीहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांच्या तक्रारीनुसार विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. रात्री साडे अकरा वाजता सावधान मित्र मंडळाजवळ मारुतीचे दर्शन घेऊन घरी जाताना विशाल कांबळेने इकडे कशाला आलास, असे म्हणून शिवीगाळ केली.

समजावून सांगत असताना इतरांनी धक्काबुक्की आणि फळीने मारण्यात सुरवात केली. डोक्यात मारहाण करून प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. वादावादीनंतर गंज पेठेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला.

सहायक पोलिस आयुक्त रमाकांत माने, खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

आचारसंहिता भंग केल्याबद्दल रासने यांच्यावर कडक कारवाई करावी

शहर कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांनी मतदान करताना आचारसंहितेचा भंग केला आहे. ते स्वतः नूतन मराठी विद्यालय प्रशाला बुध क्रमांक ७५ या मतदान केंद्रावर मतदान करायला गेले असताना त्यांनी त्यांचे चिन्ह असलेले कमळाची पट्टी गळ्यात घालून मतदान केले, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे. ही बाब गंभीर असून त्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT