kashmiri student 
पुणे

'सरहद' च्या काश्मिरी विद्यार्थ्यांचा पोलिस आयुक्तांशी संवाद

सचिन कोळी

पुणे : सास्कृंतीक,शैक्षणिक राजधानी असलेले औद्योगीक व ऐतिहासिक पुणे शहर हे देशाचे र्हदय आहे, जेंव्हा जेंव्हा देशाला विचारांची गरज भासली तेव्हा पुणे शहराने ते देण्याचे काम सातत्याने केले आहे. सर्वांना सामावून घेणार्या या शहरातील मुल्यांचा अंगीकार केल्यास कोणताही संभ्रम आणि समस्या शिल्लक राहणार नाहीत, देश हितासाठी चांगल्या विचारांची जोपासना करा आणि परिवर्तनाचा भाग व्हा असे अवाहन पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना केले.

शिक्षणासाठी पुणे शहरात आलेल्या जम्मू काश्मिरच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरहद संस्थेने पोलिस आयुक्तांशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. या निमित्ताने गेल्या पंधरा वर्षात सरहद येथे शिक्षण घेत असलेले आजी माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला.सरहदच्या प्रयत्नांमुळे पुणे शहराने काश्मिरींना आपलेसे केले आहे. परंतू महाराष्ट्राबाहेर उर्वरित राज्यातील स्थिती 
काश्मिरींसाठी सुसह्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. सध्याच्या वातावरणात देशासह पुणे शहरातही नोकरी आणि अनेक कारणांसाठी काश्मिर असा उल्लेख होताच संशयाने पाहिलं जात आहे. हे संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण विद्यार्थांसाठी अडचणीचे ठरत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 
सरहदने दिलेले शिक्षण आणि पुणेकरांच्या सहकार्यामुळे देशाचे जबाबदार नागरीक घडण्याचे भाग्य लाभले. आम्ही भारतीय आहोत हे आम्ही ठामपणे सांगतो त्याचवेळी तसा व्यापक स्विकारही व्हायला पाहिजे. 

वेंकटेशम म्हणाले, देशाच्या अत्यंत सुंदर अशा लेह लदाखमधील विद्यार्थ्यांना थेट वैचारीक शहरात आणून शिक्षण देण्याचे कठीण काम सरहद गेली पंधरा वर्षे निरंतर करत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. पुणे शहरातील विचार हे अनेक संघर्षाला निवळणारे आहेत. अनेक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता पुणे शहरातील विचारांमध्ये आहे. लहान सहान घटनांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांनी स्वच्छ अंत:करणाने उज्वल भविष्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.सरहदचे संस्थापक संजय नहार म्हणाले, सरहदसह पुणे शहरातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे शहराशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होण्यायोग्य वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य आवश्यक आहे. सरहद आपल्या परिने ते काम करत आहे, त्याचवेळी अनेकांनी पुढे आले पाहिजे.विविध स्तरावर काम करतानाच काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी सरहद मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करत असल्याची माहिती नहार यांनी दिली. विश्वस्थ शैलेश वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरहदच्या वतीने अकीब भट,जाहीद भट,जावेद वाणी,मोहंमद ईलियास, मुक्तार दार,जोगींदर सिंग, यावर खान,मंझूर बशीर यांनी संयोजन केले होते. 

"कमर्शियल आणि कर्मशील"  
कमर्शियल आणि कर्मशील याचे विश्लेषण करताना वेंकटेशम म्हणाले, लेह लदाखला जाण्याचा योग आला तो माझ्यासाठी अविस्मणीय ठरला. रोहतांग ते लदाख या मार्गावर किलाम या गावाजवळ मोटार बंद पडली. नेमका त्यावेळी मोठा पाऊस पडत होता.तेंव्हा दुर्गम भागात तत्काळ मदत मिळण्याची शक्यता नव्हती. भूकही लागली होती. त्यावेळी त्या परिसरात एक डेरा होता. सहज जावून विचारलं तर खायला पराठा मिळाला तोही केवळ दहा रूपयात. त्यावेळी शंभर रूपये मागितले तरी देण्याची तयारी होती. मात्र निसर्गदत्त स्वच्छ मनाची माणसं कमर्शियल नाहीत तर ती कर्मशील आहेत. काश्मिरच्या सौंदर्याला साजेशी अशी माणसांची सुदंर मनं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT