IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

IPL 2026 point table update after RCB vs GT match : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर Royal Challengers Bengaluru ने दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. Virat Kohli याचे शतक थोडक्यात हुकले, मात्र त्याने खेळलेली शानदार खेळी संघासाठी निर्णायक ठरली.
IPL 2026 point table update after RCB vs GT match

IPL 2026 point table update after RCB vs GT match

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहज विजय मिळवून दिला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पर्वातील या शेवटच्या सामन्यात RCB ने धुमाकूळ घातला. गुजरात टायटन्सने २०६ धावांचे लक्ष्य उभं केल्यानंतर RCB ला संघर्ष करावा लागेल असे वाटले होते, पंरतु विराट-देवदत्त यांनी चौफेर फटकेबाजी करून सामना एकतर्फा केला. जितेश शर्मा व रजत पाटीदार यांच्या विकेटने सामन्यात रंगत आणली होती, पण RCB ला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. विराटचे शतक झाले असते तर सामना आणखी गाजला असता.. आत आरसीबीचे होम सामना रायपूर येथे होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com