अग्रलेख : मार्ग मराठी, प्रवास मराठी

दैनंदिन व्यवहारातील भाषेच्या बाबतीत मराठी माणसाने आजवर आग्रही भूमिका घेतली नाही; परंतु त्याचा गैरअर्थ काढून घेऊन मराठी भाषेची पत्रासही ठेवायची नाही, अशी वृत्ती वाढताना दिसते.
Marathi language crisis

Marathi language crisis

esakal
Updated on

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीतून बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. इतरही समाजघटकांपर्यंत मराठीचा जागर पोचायला हवा.

मराठी भाषेच्या गौरवाचे हुंकार फक्त संमेलनांच्या मंडपांतून, काही पक्ष वा संघटनांच्या मेळाव्यांतून उमटत असले तरी कोणत्याही भाषेचे टिकणे आणि बहरणे अवलंबून असते ते दैनंदिन व्यवहारांमध्ये त्या भाषेचा वापर कसा आणि किती होतो, यावर. पण राज्याच्या राजधानीतच याबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर मराठी माणसाची, भाषेची मान ताठ ठेवायची असेल तर राज्यात मराठीचा डंका कायम वाजवत ठेवण्याची आवश्यकता भासते आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची त्यामुळेच दखल घ्यायला हवी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com