Road
Road Sakal
पुणे

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम ठप्प; मुदत संपण्यास उरले सहा महिने

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाजतगाजत सुरू केलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road) रुंदीकरणाचे काम (Work) अडीच वर्षांनंतरही जेमतेम वीस टक्केच झाले असल्याचे समोर आले आहे. या कामाची मुदत संपण्यास अवघे सहा महिने उरले असताना भूसंपादनातील अडचणींमुळे काम ठप्प झाले असून, या कामाच्या सल्लागारानेही प्रकल्प सोडून दिल्याचे समोर आले आहे. (Katraj Kondhwa Road work Stop)

कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौकापर्यंतच्या सुमारे पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गाचे सुमारे १५० कोटी रुपये खर्चाचे काम मुंबई येथील मेसर्स पटेल इंजिनिअरिंग कंपनी हे काम देण्यात आले आहे. या कामाची निविदा मंजूर करून ३१ डिसेंबर २०१८ मध्ये कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. वर्क ऑर्डरनुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

सहा महिन्यांची उरली मुदत

यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० टक्केच काम झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने दोन महिन्यापूर्वी हा प्रकल्प सोडून दिला आहे. त्यामुळे वर्क ऑर्डरनुसार कामाची मुदत संपण्यास अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे, असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT