keepfit
keepfit 
पुणे

जागतिक योग्य दिनानिमित्त सर्वांसाठी 'कीप फिट' पुस्तक भेट 

सकाळ वृत्तसेवा

रोजच्या जीवनातील ताणतणावांचा यशस्वी सामना करायचा असेल तर शरीर आणि मन दोन्हीही फिट असणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. भारतीय आयुर्वेदाने दिलेली आरोग्य देणगी ठरलेली योगासने शरीराला आणि मनाला व्यायाम घडवून मानसिक शांतता व स्वास्थ्य प्रदान करतात. अनेक आजार व व्याधींवर योगासने अत्यंत परिणामकारक ठरतात, असे सिद्ध झाले आहे. 

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याची माहिती देणारे 'कीप फिट' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या योगतज्ज्ञ मनाली देव यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दैनिक सकाळ मधील 'कीप फिट' सदरातील निवडक लेखांचे हे संकलन आहे. बेसिक पद्धतीच्या योगासनांचा समावेश या पुस्तकात केला असून सर्वसामान्यांना वाचून सहजपणे करता येतील अशा सोप्या भाषेत आणि सचित्र पद्धतीने योगासनांची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनाचा शासनमान्य कार्यक्रम तसेच शालेय स्तरावरील योग परीक्षांसाठीचा अभ्यासक्रमही पुस्तकात समाविष्ट केल्याने शाळांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.   

आज जागतिक योगदिनानिमित्त शासकीय स्तरावर बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. सौरव राव यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले.  रु. १०० किमतीचे  'कीप फिट' हे पुस्तक सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदीसाठी www.sakalpublications.com /amazon.in / bookganga.com वर लॉग इन करावे. अधिक माहितीसाठी वाचकांनी सकाळ पुस्तक दालन, ५९५, बुधवार पेठ, पुणे येथे अथवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT