khadakwasla-Project
khadakwasla-Project 
पुणे

धरणांमध्ये ९.६६ टीएमसी पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने धरणसाठ्यात चार टीएमसीहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी एकूण उपयुक्त पाणीसाठा ९.६६ टीएमसी झाला. शहराला दर महिन्याला सुमारे दीड टीएमसी पाण्याची आवश्‍यकता असते. यानुसार हे ९.६६ टीएमसी पाणी सहा महिने पुरेल एवढे जमा झाले आहे.

जूनमधील धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात सुरू होती. पाऊस मोजणे एक जूनपासून सुरू होते. त्यानुसार ३९ दिवसांत सात टीएमसी पाणी जमा झाले आहे. जमा पाणी सहा महिने म्हणजे जानेवारी २०२० पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला येथे १.६३ टीएमसी म्हणजे ८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत ४.१४ टीएमसी म्हणजे ३९ टक्के, वरसगावमध्ये ३.४६ टीएमसी म्हणजे २७ टक्के व टेमघर धरणात ०.४५ टीएमसी म्हणजे १२.१५ टक्के पाणी जमा झाले आहे. चारही धरणांत मिळून ९.६६ टीएमसी म्हणजे ३४ टक्के पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी ८.५० टीएमसी म्हणजे २९.१७ टक्के पाणीसाठा जमा होता. मागील वर्षीपेक्षा एक टीएमसीने आज जास्त पाणीसाठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT