Khadakwasla parking issue Letters to various departments of Haveli Police
Khadakwasla parking issue Letters to various departments of Haveli Police Sakal
पुणे

खडकवासला वाहनतळासाठी हालचाली सुरू; हवेली पोलीसांचे विविध विभागांना पत्र

निलेश बोरुडे

किरकटवाडी : खडकवासला धरण चौपाटी परिसरात सुसज्ज वाहनतळ व्हावा यासाठी आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबिरसिंह संधु यांनी याबाबत विविध शासकीय विभागांना पत्र लिहून योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. 'खडकवासला चौपाटी परिसरात वाहनतळाची गरज' अशा आशयाचे वृत्त दि. 1 जून रोजी 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे.

खडकवासला धरण चौपाटी जवळ पुणे-पानशेत रस्ता अरुंद आहे. सिंहगड किल्ला, पानशेत व वरसगाव धरण तसेच आजुबाजुच्या 30 ते 40 गावांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. दिवसेंदिवस या भागात पर्यटकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. खडकवासला धरण चौपाटी परिसरात आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येतात. याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दर शनिवार व रविवारी वाहतुक कोंडी होते. याचा पर्यटकांसह स्थानिकांनाही मनःस्ताप सहन करावा लागतो. तसेच पोलीस प्रशासनाचीही वाहतूक सुरळीत करताना दमछाक होते.

ही समस्या सोडविण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांनी पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग,वन विभाग , पोलीस अधीक्षक व हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र लिहून वाहनतळासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT