Aatik Tamboli
Aatik Tamboli sakal
पुणे

Kharadi News : जलतरण तलावात आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

खराडी : येथील एका खाजगी जलतरण तलावात आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. जलतरण तलावाच्या संचालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.

जलतरण तलावात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव अतिक नदीम तांबोळी (रा. गणेश नगर, वडगाव शेरी) असे आहे. जलतरण तलावाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाच्या पालकांनी चंदननगर पोलिसांकडे केली आहे.

मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक नुकतेच पोहायला शिकला होता. तो आज आपल्या मित्रांसोबत दुपारी तीन वाजता पोहण्यासाठी चंदननगर येथे असलेल्या खालसा जलतरण तलावात गेला होता. पोहायला गेल्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे कोणीही जीव रक्षक उपस्थित नव्हते. तसेच येथील सीसीटीव्ही कॅमेरे ही बंद आहेत. अतिक बुडाल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही.

बराच वेळानंतरही अतिकची हालचाल होत नसल्याचे लक्षात आणि नंतर त्याच्या मित्रांनी जिमच्या संचालकांना माहिती दिली. नंतर जिमच्या व्यवस्थापकांनी त्याला बाहेर काढून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा बुडुन मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले.

तांबोळी कुटुंब हे सर्वसामान्य असून गेली बारा वर्षापासून वडगाव शेरी येथे वास्तव्यास आहेत. अतिकचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात. अतिक ला दोन लहान भावंडे आहेत. एका गरीब घरातील हाताशी आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव शेरीत शोकाळा पसरली असून खाजगी जलतरण तलावाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अतिकच्या कुटुंबियांनी चंदन नगर पोलीस ठाणे गाठले असून जलतरण तलावाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत अधिक ची माहिती घेण्यासाठी चंदनगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन घेतला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात संभाजीनगरमधून अटक

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

SCROLL FOR NEXT