Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

Loksabha Election 5th Phase: हे मतदान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या 49 जागांवर नोंदवलेल्या 61.82 टक्के मतदानापेक्षा थोडे कमी आहे.
Loksabha Election 5th Phase
Loksabha Election 5th PhaseESakal

लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मतदान झालेल्या 49 मतदारसंघांमध्ये अंदाजे 60.09 टक्के मतदान झाले आहे, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले.

दरम्यान मतदान झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच 54.33 टक्के मतदान झाले.

हे मतदान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या 49 जागांवर नोंदवलेल्या 61.82 टक्के मतदानापेक्षा थोडे कमी आहे.

उत्तर प्रदेश (14), महाराष्ट्र (13), पश्चिम बंगाल (7), बिहार (5), ओडिशा (5), झारखंड (3) आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी सोमवारी पाचव्या टप्प्यात मतदान झाले.

सोमवारी मतदान झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदान झाले. सोमवारी मतदान झालेल्या राज्यांमध्ये बिहारमध्ये ५५ टक्के, झारखंडमध्ये ६३ टक्के, लडाखमध्ये ७० टक्के, महाराष्ट्रामध्ये ५४ टक्के, ओडिशामध्ये ६९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५८ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Loksabha Election 5th Phase
Rahul Gandhi and Akhilesh Yadav Interview : राहुल गांधींनी घेतली अखिलेश यांची मुलाखत;फुलपूरच्या सभेतील संवाद ‘व्हायरल’

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या चार टप्प्यांमध्ये देशभरात 66.95 टक्के मतदान झाले होते. यामध्ये पहिल्या तीन टप्प्यातील मतजानाची आकडेवारी निराशाजनक होती. मात्र, चौथ्या टप्प्यातील 69.16 टक्के मतदानामुळे एकूण टक्केवारी वाढली.

19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील जागांवर 66.14 टक्के मतदान झाले होते. ते 2019 च्या निवडणुकीतील 69.29 टक्क्यांपेक्षा कमी होते.

Loksabha Election 5th Phase
Crime News : आग्रा येथे सापडला ‘नोटांचा ढीग’;प्राप्तिकर खात्याच्या छाप्यांत साठ कोटींहून अधिक रोकड जप्त

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीने यंदाच्या निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्षा असलेल्या काँग्रेसने देशातील विविध छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र घेत 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे.

या निवडणुकीतील शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत. त्यामध्ये 26 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com