KHD
KHD 
पुणे

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर आंदोलन  

सकाळ वृत्तसेवा

खेड - शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि दुरावस्थेच्या विरोधात शिवसेनेतर्फे मंगळवारी खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. 31 डिसेंबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पुर्ण करून इतर कामे वेगाने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन रिलायन्स इन्फ्राने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. काही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे पुणे- सातारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्राकडून या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे मंगळवारी खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर टोल फ्री आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, भोर तालुका शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, मुळशी तालुका शिवसेना प्रमुख संतोष मोहोळ, भोर पंचायत सामितीचे माजी उपसभापती अमोल पांगारे, स्वाती ढमाले, दत्ता देशमाने, लाला रेणुसे आदी यावेळी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान टोलवरुन वाहने टोल फ्री सोडण्यात आली. 


रिलायन्स इन्फ्राने 31 डिसेंबरपर्यंत रस्त्याची संथ गतीने सुरु असलेली कामे वेगाने सुरु करून रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब पूर्ण करावी, अन्यथा पुढच्या वेळी शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश कोंडे आणि कुलदीप कोंडे यांनी यावेळी दिला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे सहव्यवस्थापक बी. के. सिंग, पुणे- सातारा टोल रोडचे महाव्यवस्थापक अमित भाटीया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
  
रिलायन्स आश्वासन पाळणार का? 
आजपर्यंत रिलायन्स इन्फ्राने अनेकदा आश्वासन देऊनही पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मुदतीत पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता 31 डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत रस्त्याची दुरुस्ती आणि वेगाने काम सुरु करण्याचे दिलेले आश्वासन तरी रिलायन्स इन्फ्रा पाळणार का? असा प्रश्‍न नागरीक विचारत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT