पुणे

खेडमध्येही भरणार टोमॅटो, फळ बाजार

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर (पुणे) - खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नवी उभारी घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार समितीकडून फळ बाजार, टोमॅटो बाजार, सोयाबीन खरेदी केंद्र आदी नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत असून, राजगुरुनगर व पाइपमध्ये व्यापारी संकुले उभारणार आहे. 

याबाबत बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी माहिती दिली की, बाजार समितीच्या मुख्य आणि उपबाजार आवारांमध्ये प्रामुख्याने कांदा, बटाटा, मेथी, कोथिंबीर या शेतीमालांचा व्यापार चालतो. चाकणचा जनावरांचा बाजारही प्रसिद्ध आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती मजबूत बनविण्यासाठी असे अनेक उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. तसेच, तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी सहा व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. चाकण येथे महात्मा जोतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच, बाजार समितीच्या विस्तारासाठी रोहकल ऑटो हब, वरची भांबुरेवाडी आणि चाकण येथील जागा मिळाव्यात, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केले आहेत. तसेच, आंबोली येथे जागा खरेदी करणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजार समितीचे नवीन उपक्रम 
- राजगुरुनगर आणि चाकण या ठिकाणी हुतात्मा राजगुरू सोयाबीन खरेदी विक्री केंद्र 
- आमदार मोहिते यांच्या नावाने राजगुरुनगर येथे तीन व पाईटमध्ये एक व्यापारी संकुले 
- चाकण येथे टोमॅटो आणि फळांचा बाजार 
- चाकण व शेल पिंपळगाव येथे इलेक्ट्रॉनिक वजन काटे 
- पाईट आणि शेल पिंपळगाव येथे शीतगृह 
- शेल पिंपळगाव येथे पेट्रोल पंप आणि मंगल कार्यालय 
- शेल पिंपळगाव येथे कांदा निर्यात सुविधा केंद्र 
- शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT