Pune Municipal Corporation sakal
पुणे

किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण; सुरक्षा रक्षक निलंबीत, ३३ जणांच्या बदल्या

जम्बो कोवीड रुग्णालयाच्या संदर्भात किरिट सोमय्या हे ५ फेब्रुवारी रोजी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी आले होते.

सकाळ वृत्तसेवा

जम्बो कोवीड रुग्णालयाच्या संदर्भात किरिट सोमय्या हे ५ फेब्रुवारी रोजी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी आले होते.

पुणे - भाजप नेते किरिट सोमय्या (kirit somaiya) यांना महापालिकेत (Municipal) शिवसैनिकांनी (Shivsena Activists) धक्काबुक्की (pushback) केल्याच्या प्रकरणात महापालिकेच्या एका सुरक्षा रक्षकाला (Security Guard) निलंबित (Suspend) केले आहेत, एकास सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर ३३ जणांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

जम्बो कोवीड रुग्णालयाच्या संदर्भात किरिट सोमय्या हे ५ फेब्रुवारी रोजी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी आले होते. या दिवशी महापालिकेला सुट्टी असल्याने इतर नागरिकांना प्रवेश देण्याची गरज नव्हती. तरीही सोमय्या येण्यापूर्वी शिवसैनिकांनी महापालिकेत प्रवेश केला. सोमय्या येताच जोरदार घोषणाबाजी करत सोमय्यांच्या विरोधात आंदोलन चालू केले. त्यामध्ये धक्काबुक्की झाल्याने सोमय्या हे पायऱ्यांवरून खाली पडले.

तसेच शिवसैनिकांनी हातात दगड घेतल्याचे व्हिडिओ देखील समोर आला. सोमय्या ना झेड सुरक्षा असतानाही शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीचे पडसाद उमटले. सोमय्यांनी मला मारण्याचा कट होता असा आरोप केला. याप्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील लक्ष घालून, या प्रकरणाचा तपास केला. याप्रकरणी दोन पोलिस कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.

याप्रकरणावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे खुलासा मागितला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी खुलासा करण्याचे आदेश दिले. जगताप यांनी दिलेल्या अहवालानुसार प्रशासनाने कारवाई केली आहे. ५ फेब्रुवारी रोजी शिवसैनिकांना महापालिकेत प्रवेश दिल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षक निलंबित केले, एकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर ३३ सुरक्षा रक्षकांना समज देऊन त्यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, काल (ता.११) महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी महापालिका प्रशासनाने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

SCROLL FOR NEXT