शारदानगर (ता. बारामती) - कृषिक प्रदर्शन पाहण्यासाठी शुक्रवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.
शारदानगर (ता. बारामती) - कृषिक प्रदर्शन पाहण्यासाठी शुक्रवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी केलेली गर्दी. 
पुणे

कृषिकला गर्दी

सकाळवृत्तसेवा

बारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित झाले.

या कृषिक प्रदर्शनात आज नांदेड, गडचिरोली, हिंगोली, परभणीपासून अगदी सातारा, कोल्हापूर, चंदगड, बेळगाव, रत्नागिरीपर्यंतचे शेतकरी स्वयंस्फूर्तीने आले होते. या शेतकऱ्यांपैकी अनेकांनी गुरुवारी रात्रीच बारामतीत पोचून मुक्काम केला व सकाळपासून प्रदर्शनात सहभाग घेतला. या शेतकऱ्यांनी शेतीची विविध प्रात्यक्षिके व यांत्रिक अवजारांना पसंती दिली. बहुतांश शेतकरी हे आपल्या कुटुंबासमवेत आले होते. कृषिक पाहण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नीलाही आणावे, जेणेकरून नवे तंत्र महिला शेतकरी खूप लवकर आत्मसात करतील, अशी जनजागृती गेली दोन वर्षे केली जात होती, त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आज जाणवले.

आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी भुसार शेतीची व भाजीपाल्याच्या पिकांची सूक्ष्म पाहणी केली. पिकांचे नवे वाण, त्यांचे नेमके हंगाम, उत्पादनाची टक्केवारी, कमी पाण्यात येणाऱ्या, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, कमीत कमी खत- औषधे लागणाऱ्या, रोगप्रतिकारक गुण उत्तम असणाऱ्या पिकांची त्यांनी कंपन्यांकडून माहिती घेतली. चौकस शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवे तंत्र नेताना आपल्या जमिनीत ते तगेल, अशा पद्धतीने सारी माहिती तज्ज्ञांकडून घेण्यास प्राधान्य दिले. कमी खर्चाच्या शेडनेट शेतीलाही शेतकऱ्यांनी अधिक पसंती दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT