Laboratory
Laboratory 
पुणे

महाविद्यालयांमधील प्रयोगशाळांची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना पुणे विभागातील अनेक महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम प्रॅक्‍टिकल परीक्षेवर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा सुस्थितीत आहेत का? याची भरारी पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. 

बारावीची वार्षिक परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्राची प्रॅक्‍टिकल परीक्षा महाविद्यालयांमध्ये होते. त्यांना विविध रसायनांच्या प्रयोगाने अपेक्षित प्रक्रिया घडवून आणून, त्याची निरीक्षणे, निष्कर्ष लिहावे लागतात. परीक्षा मडळांने नेमलेल्या परीक्षकासमोर हे प्रयोग करून दाखविताना त्यांना तोंडी उत्तरेही द्यावी लागतात. 
परीक्षेची तयारी सुरू असताना महाविद्यालयांमधील प्रयोगशाळांची दुरवस्था झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या तुलनेत चंचूपात्र, परीक्षानळी, बीकर, तापमापी, गॅस, पीएच पेपर, असे प्रयोगाचे साहित्य कमी आहे. विविध रसायने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. त्याचा परिणाम प्रॅक्‍टिकलच्या परीक्षेत होतो. या असुविधांमुळे विद्यार्थ्यांना नीट प्रयोग करता येत नाहीत, याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारीही आल्या आहेत.

जेथे केवळ कनिष्ठ महाविद्यालये आहेत, तेथील प्रयोगशाळेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच भरारी पथकाकडून तपासणी करून सुधारणा न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल. 
- प्रवीण अहिरे, विभागीय उपसंचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT