death
death Sakal
पुणे

Kharadi News : दहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन डक्टमध्ये पडल्यामुळे एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी चौकशीनंतर चंदननगर पोलिसांनी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बिश्वनाथ खुदीराम बिस्वास (वय-३१, रा. खराडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी बिश्वनाथचा भाऊ अभिजित (वय-३२, रा. खराडी) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून ठेकेदार फहिम उस्मान शेख (वय-३३, रा. संजय पार्क, लोहगाव) आणि दीपन देवास समाजदार (वय-३६, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्वनाथ आणि इतर कामगार खराडीतील चौधरी वस्तीमधील एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होते. २१ सप्टेंबर रोजी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून तोल जाऊन बिश्वनाथ डक्टमध्ये पडला.

सुरक्षा जाळी निकृष्ट दर्जाची असल्यामुळे तो खाली पहिल्या मजल्यावर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे बिश्वनाथचा मृत्यू झाला. ठेकेदारांनी बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना केल्या नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी ठेकेदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Message: ध्यान संपलं... एक्झिट पोल जाहीर; PM मोदींचा देशाला उद्देशून संदेश

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

SCROLL FOR NEXT