धनकवडी - अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानवता पुरस्काराचे सोमवारी नारायण राणे यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी पुरस्कार स्वीकारताना राजेश काची. सोबत(डावीकडून) डॉ. शिवाजीराव कदम, डॉ.विश्‍वजित कदम, राणे, डॉ. पतंगराव कदम, मकरंद अनासपुरे.
धनकवडी - अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानवता पुरस्काराचे सोमवारी नारायण राणे यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी पुरस्कार स्वीकारताना राजेश काची. सोबत(डावीकडून) डॉ. शिवाजीराव कदम, डॉ.विश्‍वजित कदम, राणे, डॉ. पतंगराव कदम, मकरंद अनासपुरे. 
पुणे

समाजामध्ये संस्काराचा अभाव - राणे

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'देशातील नागरिकांची बौद्धिक पातळी उंचावत असली तरी, सामाजिक नैतिकता हरवत आहे. यामुळेच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाही नागरिक पैसे घेतात. भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी असणारे शिक्षकदेखील यामध्ये सहभागी असतात. यामुळेच समाजामध्ये संस्काराचा अभाव आहे,'' असे मत कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित "अभिजित कदम मानवता पुरस्कारा'चे राणे यांच्या हस्ते वितरण झाले. संस्थात्मक कार्यासाठीचा पुरस्कार नाम फाउंडेशनला, तर व्यक्तिगत पुरस्कार जीवरक्षक राजेश काची यांना प्रदान करण्यात आला. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, न्यासाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्वजित कदम, मोहन कदम उपस्थित होते. संस्थात्मक कार्यासाठी एक लाख, तर व्यक्तिगत पुरस्कारासाठी 25 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी "नाम'तर्फे मकरंद अनासपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल आणि पुरस्कारांबद्दल डॉ. कदम यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT