पुणे

धनकवडीतील संस्थेसमोर ठेवीदारांचे दहा दिवसांपासून आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

कात्रज : ठेवी परत मिळाव्यात म्हणून शंभराहून अधिक ठेवीदारांनी पुण्याईनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेसमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. गेले दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. दिवाळीपूर्वी आमच्या ठेवी परत करा, अशी आंदोलकांची मागणी आहे. 

धनकवडी येथील भाजी विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, छोटे व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिकांनी या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी आपली आयुष्यभराची कमाई या पतसंस्थेत ठेवली होती. सत्तावीस वर्षे पतसंस्था सुरळीत चालली होती. मात्र दहा महिन्यांपूर्वी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन झाले. त्यानंतर पंधरा दिवस पतसंस्था बंद होती. त्यानंतरचे दोन महिने ठेवी परत मागायला गेलेल्यांना केवळ पाच ते दहा हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर तर ठेवीवरचे व्याज, ठेवी, बचत खात्यात जमा रक्कम मिळणे बंद झाले. अखेर सहकार आयुक्त, उपनिबंधक, जिल्हाधिकारी, सहकारमंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ठेवीदारांनी पतसंस्थेसमोर चक्री उपोषणाला सुरवात केली आहे. 

एकोणनव्वद वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक दिगंबर अंमलदार म्हणाले, "माझी 
आयुष्यभराची कमाई तेवीस लाख रुपये पतसंस्थेत ठेवले होते. ठेवीवर येणाऱ्या व्याजातून चरितार्थ सुरू होता; पण आता जगायचे कसे, हा प्रश्‍न आहे.'' 

शिंदे कुटुंबीयांनी बारा लाख रुपयांची ठेव ठेवली होती. मुलीच्या लग्नासाठी त्यांना केवळ तीन लाख रुपये मिळाले. अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसह तब्बल दोनशेहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्या आहेत. दिवाळीपूर्वी ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी ज्ञानदेव एरंडे, गंगाधर दिवरे, रमेश कनोजिया, चंद्रकांत खमीतकर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT