पुणे

मंचरकरांसाठी महत्वाची बातमी; उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना मिळणार दिलासा!

डी. के. वळसे-पाटील

मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रादुर्भाव झालेल्या व विशेषतः व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागत होते. पण मंचरला अद्ययावत तंत्रज्ञान असलेली रक्त तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यासाठी दहा लाख रुपयांचे ऑटोअँनालायझर यंत्र व चार लाख रुपये किमतीचे एबीजीए यंत्र सरकारकडून उपलब्ध झाले आहे.

तसेच अन्य गरजेचे केमिकल्स आणि इतर उपकरणे खरेदीसाठी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन लाख २० हजार रुपये रक्कम उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रक्त चाचण्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. रुग्णांना मोफत सुविधा मिळणार आहे" अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली.

अन्य आजार व कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुण्याला पाठविले जात होते. अहवाल येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत होता. तसेच प्रवासासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या धावपळीबरोबरच खासगी प्रयोगशाळा चालक ८ ते १० हजार रुपये शुल्क आकारात होते. ही समस्या वळसे पाटील यांच्या निदर्शनास रुग्णकल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे व डी. के. वळसे पाटील यांनी आणून दिली. वळसे पाटील यांनी ताबडतोब राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालयाने प्रस्ताव आरोग्य विभागाला सादर केला होता. त्याप्रमाणे कार्यवाही झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे रक्तातील ऑक्सिजनचे, काविळीचे प्रमाण, किडनी, यकृत, हृदय विकार, प्रथिनांचे प्रमाण, क्षारांचे व साखरेचे प्रमाण अशा २४ प्रकारच्या तपासण्या होणार. त्यापैकी आठ तपासण्या सुरु झाल्या. उर्वरित तपासण्या खरेदी केलेली उपकरणे प्रयोगशाळेत उपलब्ध झाल्यानंतर पुढील आठवड्यात सुरु होतील. -डॉ. अंबादास देवमाने वैद्यकीय अधीक्षक मंचर उपजिल्हा रुग्णालय
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT