पुणे

कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून ‘लक्ष्मी’चे आगमन

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिंदोळ्याची पाने पिसायची. लोखंडी खिळ्यांनी एकसारखी करायची. पानाचे पिसारे काढायचे. मापाप्रमाणे पाने कापायची आणि वाक, सुतळी किंवा नायलॉनच्या दोरीने सहा इंचापर्यंत घट्ट शिवण शिवायची. धागा विणता विणता कष्टसाध्य ‘लक्ष्मी’ तयार होते. हीच ‘लक्ष्मी’ (केरसुणी) प्रतिष्ठा मिळवून देते. म्हणून तर लाखो नगांच्या खरेदी-विक्रीतून महाराष्ट्राला समृद्धी देणारी ‘लक्ष्मी’ बाजारपेठेत आली आहे. 

दिवाळीनिमित्त आंध प्रदेश, कर्नाटक येथून ‘लक्ष्मी’ महाराष्ट्राच्या भेटीला आली आहे. या निमित्ताने व्यापारीवर्गाकडूनही ‘लक्ष्मी’ची ऑर्डर परराज्यांतील कारखानदारांना देण्यात आली आहे. पूर्वी सोलापूर, सांगली येथून ‘लक्ष्मी’ येत असे. मात्र, शिंदोळ्याची झाडे फारशी शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला आंध्र प्रदेश, कर्नाटकवर अवलंबून राहावे लागते. त्यातच ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहा, आठ, दहा इंच, एक ते दीड फूट, दोन ते अडीच आणि अडीच ते तीन फुटांच्या केरसुण्या(लक्ष्मी) बाजारात आल्या आहेत. घुंगरे, पाच फण्यांचा फडा, बांगडीच्या आकारातील वीण असो, की लाकडी दांड्याची केरसुणी असो. ग्राहकांच्या पसंतीनुसार ‘लक्ष्मी’ला सजविण्यात येते. मात्र, सर्वसाधारणतः सर्वसामान्यांना परवडेल हाताळायला सोईस्कर असलेल्या ‘लक्ष्मी’ला अधिक पसंती आहे. शहरात दिवाळीत दहा कोटींच्या आसपास ‘लक्ष्मी’च्या खरेदी-विक्रीतून उलाढाल होते.

महाराष्ट्रात केरसुणीला ‘लक्ष्मी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धेने तिचे पूजन दिवाळीत होते. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आदरयुक्त असतो. स्वच्छता, प्रसन्नतेचे प्रतीक असलेली ही ‘लक्ष्मी’ गोरगरिबांसह सर्वच नागरिक खरेदी करतात.
-   संजय सोनावणे, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT