Lenyadri Girijatmaj Ganpati
Lenyadri Girijatmaj Ganpati Sakal
पुणे

Ganesh Jayanti : लेण्याद्रीला माघी गणेशजयंती सोहळा उत्साहात संपन्न

दत्ता म्हसकर

जुन्नर - श्री क्षेत्र लेण्याद्री, ता. जुन्नर येथे येथील अष्टविनायक श्री गिरिजात्मज गणेशाचा जन्मोत्सव आज मंगळवार ता.१३ रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

श्री च्या दर्शनासाठी पहाटेपासुन भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते पहाटे श्रीं चा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला.

गणेश जयंतीनिमित्त बाळासाहेब कुर्‍हाडे, प्रशांत थोरात, मनोहर भालेराव, संदीप बोचरे, व ॲड. विवेक खत्री यांच्या उपस्थितीत महाआरती झाली. सकाळी मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले. यानंतर पारंपारिक पद्धतीने महिलांनी पाळणा म्हणून श्री गणेश जन्मसोहळा केला. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

देवस्थानचे उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, विजय वर्‍हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, कैलास लोखंडे, जितेंद्र बिडवई, देवस्थानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश जयंतीनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. दिवसभर बैलगाडे घाट चालु होता. बैलगाडा शौकीनांनी शर्यतीचा आंनद घेतला. देवस्थान ट्रस्ट व आधार रक्तपेढी यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली होती. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवार ता.१४ रोजी गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तनाने होणार आहे. श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने रविवार ता.११ रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते याचा परिसरातील १६६ रुग्णांनी लाभ घेतला.

यात १३५ जणांचे डोळे तपासणी करण्यात आली.६३ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. यातील मोतीबिंदूच्या २० जणांवर शस्रक्रिया करण्यात येणार आहेत. २७ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. इतर विविध तपासण्या करण्यात आल्या अशी माहिती अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT