आळेफाटा : आळे आगरमळा लगत बोरी शिवारात आढळून आली बिबट्याची पिल्ले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे बोरी(ता.जुन्नर) हद्दीमधील सुनिल आबाजी कुऱ्हाडे यांच्या शेतातील उस तोडणी सुरू असताना दि.७ गुरुवारी दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती.याबाबतची माहीती त्यांणी आळे गावचे उपसरपंच अँड.विजय कुऱ्हाडे यांना दिली. त्यानंतर उपसरपंचांणी वनअधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली होती उसतोड कामगारांनी तोडणी थांबवली होती.
या ठिकाणी सापडलेली पिल्ले लहान लहान असल्याने पिल्लांना त्यांची आई घेवून जाईल यासाठी पुन्हा त्याच शेतात सोडण्यात आले होते.परंतु आज दि.८ रोजी सकाळी ऊस तोडणीला आलेल्या कामगारांना ऊसातुन बिबट्याच्या मादीचा आवाज येत होता व त्याच ठिकाणी ती पिल्ले आढळून आली. उसातून बिबट्याच्या आवाज येवू लागल्याने पुन्हा उसतोड बंद करण्यात आली .व या ठिकाणी असलेल्या बिबटयाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच विजय कु-हाडे यांणी केली आहे.
दरम्यान आळेफाटा परीसरात आळे,बोरी, राजुरी ही गावे बिबट प्रवण क्षेत्रात मोडत असुन या परीसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असुन ऊस तोड संपत आली असुन या ठिकाणी बिबटयांणा लपण न राहिल्याने ते मानवी वस्तींमध्ये येऊ लागले आहेत .या बिबटयांणा पकडण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.