Leopard Cage
Leopard Cage Sakal
पुणे

Leopard : एक महिन्या पासून बिबट्या वनविभागाला देतोय गुंगारा

रवींद्र पाटे

आंब्याच्या झाडावरून शेळ्यांच्या गोठ्यात उडी मारून बिबट्याने शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळी जखमी झाली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास वारुळवाडी येथे झाली.

नारायणगाव - आंब्याच्या झाडावरून शेळ्यांच्या गोठ्यात उडी मारून बिबट्याने शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळी जखमी झाली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास वारुळवाडी येथे झाली. आज सकाळी नऊ वाजता वारुळवाडी हद्दीतील डेरे मळा शिवारातील राजेंद्र डेरे यांच्या शेतात मुक्त संचार करत असलेला बिबट्या आढळला. मागील एक महिन्या पासून बिबट्या वनविभागाला गुंगारा देत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज दुपारी तीन वाजता पिंजरा लावण्यात आला आहे. अशी माहिती वनपाल अनिता होले यांनी दिली.

वारुळवाडी येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराच्या परिसरामध्ये या पूर्वी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन बिबटे जेरबंद झाले आहेत. परिसरामध्ये अजून एका बिबट्याचे वास्तव्य असल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी सबनीस विद्यामंदिराच्या मुलींच्या वसतिगृहा जवळ एक महिन्यापूर्वी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र बिबटया वनविभागाला गुंगारा देत आहे. मागील आठवड्यात येथील तुकाराम निंबाळकर यांच्या गोठ्यातील बकरू बिबट्याने पळवून नेले.

रविवारी (ता. ८) पहाटे वारुळवाडी येथील विलास पाटे यांच्या शेळ्यांच्या गोठ्याच्या जवळ असलेल्या आंब्याच्या झाडावरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला.शेळीची मान जबड्यात धरून गोठ्याच्या आठ फुटी कंपाउंड वरून उडी मारत असताना शेळी कंपाउंडला अडकली. त्या नंतर बिबटया पसार झाला.या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे.

शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने उडी मारून शिळीवर हल्ला केला.या हल्ल्यात शेळी जखमी झाली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास झाली. या भागात लोकवस्तीची जास्त घनता असल्याने उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी या घटनेची दखल घेऊन आज दुपारी पिंजरा लावला आहे. या बिबट्याचा मागील एक महिन्यापासून वावर आहे. या भागातील अनेक पाळीव व भटके कुत्रे, शेळ्या बिबट्याने फस्त केले आहेत. या भागात शाळा असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. अशी सूचना वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT