पुणे

ग्रह, तारे अन् नक्षत्रांशी जडवू नाते (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे -  संध्याकाळ पुढे सरकू लागली, की आकाशात नजर टाकल्यावर आपल्याला एकेक ग्रह, तारे दिसू लागतात. तारकांचे समूह दिसतात. आजी-आजोबांपैकी कुणीतरी सांगतं ...तो बघ ध्रुवतारा, ...ते पहा सप्तर्षी किंवा ...तो बघ मंगळ. आपण या सगळ्यांशी मस्त दोस्ती करण्यासाठी सुटीत भरपूर आकाश निरीक्षण करूया.

संस्कार तर्पे, आरुष रॉय व प्रणव भुजबळ हे तिघे सोनलताईंकडून आकाश निरीक्षण शिकत होते. सोनल थोरवे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘आयुका’ या संस्थेत विज्ञानप्रसारक व खगोल अभ्यासक आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘सूर्यास्त झाल्यानंतर सध्या पश्‍चिम क्षितिजावर व्याध (इंग्रजीत याला सीरियस म्हणतात) हा तेजस्वी तारा दिसतो. लवकरच तो सूर्य बुडतो तेव्हाच तो गडब होईल. व्याधाच्या उजवीकडे तांबूस रंगाचा मंगळ मंदपणे लुकलुकताना दिसतो आहे. पण, तो प्रकाशप्रदूषणामुळे शहरातून दिसणे कठीण. शहराबाहेरील अंधाऱ्या जागेतून तो बघता येईल.’’

सोनलताईंनी असेही सांगितले की, पूर्वेकडे दोन बऱ्यापैकी तेजस्वी तारे दिसतात. ते मिथुन राशीतील ठळक असे कॅस्टर व पोलक्‍स किंवा कॅश व प्लव आहेत. साधारणपणे डोक्‍यावर निळसर तेजस्वी तारा दिसतो आहे; त्याच्या उजवीकडे काही मंद प्रकाशाच्या ताऱ्यांची मिळून काल्पनिक विळ्यासारखी आकृती दिसते. हा सिंह तारकासमूह असून, तेजस्वी तारा मघा (रेग्युलस) आहे. उजव्या हाताला उत्तरेकडे सात ताऱ्यांची, काल्पनिक पतंगासारखी आकृती दिसते. हा सप्तर्षी तारकासमूह पाहून वाट चुकलेले किती तरी खलाशी व प्रवासी ध्रुवतारा शोधून काढून दिशा अचूक ओळखतात. आकाशात दिसणाऱ्या ग्रह, तारे व नक्षत्रांच्या जागांमध्ये व वेळेत आपल्याला पृथ्वीभ्रमणामुळे बदल दिसतात. हे कसे होते ते आपण आकाश निरीक्षणाचा छंद जडवून शोधूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT