प्रतिबंधित माओवादी संघटनेची सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला न्यायालयाने आठ वर्ष सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे - प्रतिबंधित माओवादी संघटनेची सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला न्यायालयाने आठ वर्ष सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.
२०१४ मध्ये अरुण भेलके ऊर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन ऊर्फ सोनाली पाटील (वय ३३) यांना महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून अटक केली होती. दोघांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाल (युएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत २०१४ साली विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीपासून भेलके हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रूग्णालयात मृत्यू झाला आहे. कांचनला महाविद्यालयीन जीवनापासून हृदरोगाचा त्रास होता व गेले अनेक दिवस तिच्यावर उपचार सुरू होते.
अरुण आणि कांचन दोघेही चंद्रपूरचे आहेत. त्यांनी माओवादी संघटनेच्या आदेशानुसार मुंबई, पुणे या शहरात काम करून येथील वस्त्यांमधील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुंबईत वास्तव्यास असताना अरुण भेलके हे एल्गार प्रकरणातील आरोपी सुधीर ढवळे यांच्या रिपब्लिकन पँथर्स संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होत्या. पुढे भेलके आणि कांचन यांनी आदित्य पाटील व सोनाली पाटील नावाने बनावट नावाचे पॅन कार्ड मिळविले असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते.
भेलके हा माओवादी नेता दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे सोबत माओवादी चळवळीत सक्रिय होता. शहरी भागात माओवादी चळवळ पसरविण्याचे काम अरुण व त्याची पत्नी करीत. जंगलात त्याची व आपली तेलतुंबडेच्या उपस्थित भेट व चर्चा झाली आहे, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने न्यायालयासमोर दिली होती. दलित संघटनांना चळवळीत सहभागी होण्याकरिता प्रेरित करतो, असे त्याने सांगितले होते. त्याची काम करण्याची पद्धतीने त्याने न्यायालयास सांगितले होती. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्यावतीने ॲड. उज्ज्वला पवार यांनी पाहिले. तर ॲड. रोहन नहार यांनी अरुण भेलके याच्यावतीने बाजू मांडली.
झोपडपट्टीतील तरुणांना माओवादी चळवळीत घेण्याचा प्रयत्न -
एटीएसच्या दोषारोपपत्रानुसार, भेलकेने पुण्यातील झोपडपट्टीतील काही तरुणांना माओवादी चळवळीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. एटीएसने आरोपींकडून अनेक कागदपत्रे, हस्तलिखित कागदपत्रे आणि लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हसारखे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले होते. एटीएसने असा दावा केला होता की, त्यांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून ‘माओवादी कम्युनिकेशन्स’ मिळवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.