पुणे

पुणे-मुंबईदरम्यान लोकल सेवा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-मुंबईदरम्यान लोकल सेवा लवकरच प्रत्यक्षात साकारण्याची चिन्हे आहेत. या मार्गावरील घाट पार करण्यासाठी चेन्नई येथे तयार केलेली विशेष १२ डब्यांची लोकल नुकतीच मुंबईत आली. या लोकलची घाटमार्गात येत्या महिन्यात चाचणी होणार आहे. ती यशस्वीपणे पार पडल्यावर पुणे-मुंबईदरम्यान लोकल धावू शकते, त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे.  

पुणे-मुंबई लोहमार्गावर लोकल सुरू करण्यासाठी या मार्गावर असलेल्या घाटमार्गात या लोकलची चाचणी घेणार आहे. त्यासाठी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्‍टरीमध्ये (आयसीएफ) लोकलच्या इंजिन क्षमतेत वाढ करून ती घाट पार करू शकेल, अशी निर्मिती केली. आधुनिक ब्रेक प्रणाली हे तिचे वैशिष्ट्य आहे. एक महिन्यात चाचणी होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने तयारी सुरू केली आहे. या मार्गाबरोबर मुंबई-नाशिक मार्गावरही लोकलची चाचणी होणार आहे. ही लोकल सुरू झाल्यावर या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे; तसेच गाड्यांची संख्याही वाढणार आहे.  

याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा म्हणाल्या, पुणे-मुंबई लोकल सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी करीत आहेत. आता चाचणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या मार्गावर लोकल सेवा नियमित सुरू करावी. ही लोकल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावली पाहिजे.

चेन्नईमध्ये तयार केलेल्या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल केले असून, कुर्ला कार शेड येथे लोकलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येणार आहे. महिनाभरात या मार्गावर चाचणी घेण्यात येईल. चाचणी यशस्वी झाली तर, मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक लोकल सुरू करण्यात येईल.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT