admission
admission 
पुणे

अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार; सुधारित प्रक्रिया झाली निश्चित

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 24 ; पुणे आणि पिंपरी-चिंचवड कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइनच होणार आहेत. मात्र, 'प्रथम येणारास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) फेऱ्या मात्र होणार नाहीत. प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका देखील छापील नव्हे; तर पीडीएफ रुपात दिली जाणार आहे. पुण्यासह नागपूर, अमरावती, नाशिक औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केले जातात. लॉकडाऊनमुळे या वर्षी ऑनलाइन प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी पुढे आली होती. पण शालेय शिक्षण विभागाने ही प्रक्रिया या वर्षी देखील ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची सुधारित प्रक्रिया देखील निश्चित करून दिलेली आहे.

सुधारित कार्यपध्दतीत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरीता (एसईबीसी) असलेले आरक्षण 16 टक्क्यांऐवजी 12 टक्के करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी असलेले आरक्षण तीन टक्क्यांवरून  चार टक्के केले आहे. याव्यतिरिक्त, संवैधानिक आरक्षण, अल्पसंख्यांकासाठी राखीव कोटा व व्यवस्थापन कोटा हा प्रचलित तरतुदीनुसार राहील.
नव्या प्रवेश प्रक्रियेनुसार  द्विलक्षी अभ्यासक्रमाचे (बायफोकल) प्रवेश हे शून्य फेरीमध्ये होणार नाहीत. हे प्रवेश नियमित फेरीमध्ये समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून करण्यात यावेत, अशा सूचना या विभागाने दिल्या आहेत. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेशाबाबत सद्यस्थितीत असलेले अन्य नियम मात्र लागू राहतील.

'एफसीएफएस' फेरी रद्द
प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेरीची प्रक्रीया अवलंबिण्यात येणार आहे. जेथे सर्व रिक्त जागा राहतील, त्या सर्वसाधारण जागांमध्ये रुपांतरित करण्यात येतील आणि आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित जागा देण्यात येतील.

नियमित फेरी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. नियमित फेरीत प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. घेतलेले प्रवेश रद केलेले तसेच शाखा वा महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचा प्रवेश रद्द करून पहिली विशेष फेरी व नंतरच्या अतिरिक्त विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.
नियमित फेऱ्या संपल्यानंतर एक विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. ती संपल्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. बारावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही सूचित करण्यात आले आहे. 

छापील पुस्तिका नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे, विद्यार्थ्यांना छापील माहिती पुस्तिका न देता डिजिटल स्वरुपात माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. ही माहिती पुस्तिका पीडीएफ बुकलेट स्वरुपात ऑनलाईन प्रणालीवर तसेच मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. शाळा-महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर माहिती पुस्तिकेच्या कमीत कमी पाच प्रती विद्यार्थ्यांना संदर्भासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. शिक्षण संचालकांनी मार्गदर्शन केंद्रावरही माहिती पुस्तिकेच्या कमीत कमी पाच उपलब्ध करुन द्याव्यात, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

रुग्णसंख्या वाढीमागे चाचण्यांचे कारण नाही; जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण 

ऑनलाइन शुल्क भरता येणार
कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया शुल्क फक्त ऑनलाइन भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देखील आता उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य शिक्षण मंडळांच्या माध्यमिक शाळांच्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका, आरक्षणाचा दावा केला असल्यास त्यासंबधी आवश्यक कागपत्रांची शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांकडून प्रवेश प्रक्रियेदरम्यान पडताळणी करून घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT